शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर लोकसभेसाठी वळसे-पाटील उमेदवार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:02 IST

शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.

शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघासाठी कोण उमेदवार असणार, हे सांगायचे टाळतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे येथे स्पष्ट केले.याच वेळी अ‍ॅड. अशोक पवार किंवा प्रदीप कंद यांपैकी एक शिरूर लोकसभेसाठी उमेदवार असेल असेही सूचित केले. येथे आयोजित हल्लाबोल सभेत पवार यांनी शिरूर हवेली विधानसभा व शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद असताना तसेच जनताही आपल्या सोबत असताना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होत असल्याबाबत खंत व्यक्त केली. याच वेळी उमेदवारीबाबत बोलताना वळसेपाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना वळसेपाटील हेच आगामी लोकसभा निवडणुकीत चांगली लढत देतील व राष्ट्रवादीचा विजय होऊ शकेल, अशी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची भावना आहे. पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे मात्र आढळराव यांना पराभूत करू शकणारा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कोणाला पुढे करणार याबाबत राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता आता आहे. याबाबत पवार हे यावेळी फारच गंभीर असल्याच दिसून आले.शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी गेली दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. तर जि. प. चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही यासाठी प्रयत्नशील आहे. आजच्या सभेत अ‍ॅड. पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या समोर या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यावी हा पेच आहे. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्त्यात ठेवला. यामुळे या दोघांपैकीएकाला शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पवार देणार हे मात्र नक्की झाले.शिरूर लोकसभा व शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असताना पक्षाचा पराभव होतो, याबद्दल पवार यांच्याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांनीही नाराजी व्यक्त केली. पराभव जनतेमुळे नाही तर व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे होतो, असेही त्यांनी सुनावले. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे असून लोकसभा व विधानसभेला कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवारी द्या, असा सल्लाही दिला. एकाला खासदार तर दुसºयाला आमदार करू, असे सांगून पवार यांनी दुसºयांदा हा निर्णय गुलदस्तात ठेवला.