शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिरीष कुलकर्णीच्या ट्रम्प टॉवरमधील घराचे महिन्याचे भाडे ४ लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:08 IST

बांधकाम व्यावयायिक डी. एस. कुलकर्णी(डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी (३३, रा. चतु:शृंगी) हा कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरमध्ये दरमहा ४ लाख रुपये भाडे देऊन राहत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

पुणे : बांधकाम व्यावयायिक डी. एस. कुलकर्णी(डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी (३३, रा. चतु:शृंगी) हा कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरमध्ये दरमहा ४ लाख रुपये भाडे देऊन राहत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी शिरीष याला सोमवारी न्यायालयात हजर केले. त्याच्या पोलीस कोठडीत ५ जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी दिला आहे. शिरीष हे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या डीएसके मोटर्स प्रा. लि. कंपनीमधून भाडे देत होते, असे तपासात निष्पन्न झाले. ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांनी १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मुख्य आरोपी दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके), पत्नी हेमंती, मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे, पुतणी सई, तिचा नवरा केदार वांजपे, महाराष्ट्र बँंकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह १३ जणांना अटक केली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिरीष २५ जून रोजी येथील सत्र न्यायालयात शरण आला होता. शिरीषची पत्नी तन्वी हिच्यावरही गुन्हा दाखल आहे. तिच्या खात्यात त्याने १२ कोटी रुपये वर्ग केले आहेत. तो भागीदार असलेल्या कंपनीने रिझर्व बँंकेच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदा मुदत ठेवी स्वीकारल्या. त्या कंपन्या डीएसके ग्रुप आॅफ पार्टनरशिप फर्म या कंपनी अ‍ॅक्टखाली नोंदणी केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना मुदत ठेवी स्वीकारण्याचा अधिकार नाही. फुरसुंगी येथील हायब्लीसचे एनसीडीकडे गहाण असलेले १११ फ्लॉट गुंतवणूकदारांची परवानगी न घेता शिरीष याने कोट्यवधींना विकल्याचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.माहिती देण्यास टाळाटाळशिरीष याची आई हेमंती यांच्या खात्यावरून त्याच्या बँंक आॅफ महाराष्ट्रच्या चालू खात्यावर तब्बल १४३ कोटी वर्ग झाले. याबाबत माहिती देण्यास तो टाळाटाळ करत आहे. तो संचालक असलेल्या डीएसके मोटर्स, डीएसके मोटोव्हिल, तलिस्मान हॉस्पिलिटी सर्व्हिस प्रा. लि. आणि डीएसके शिवाजीन्स फुटबॉल क्लब प्रा. लि. या कंपन्यांमध्ये ठेवीदारांकडून गोळा केलेल्या रकमेपैकी ५१ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्याने २०११मध्ये टाकवी बुद्रूक येथे २३ एकर जमीन ३६ कोटी रुपयांना विकत घेतली. ही जमीन स्वत:च्याच डीएसके मोटोव्हील या कंपनीला दर महिना ४६ लाख रुपये भाड्याने दिली होती, असे रिमांड रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणे