शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शरद सोनवणे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: February 21, 2016 03:06 IST

जुन्नर तालुक्यातील ई-टेंडर मला भेटल्याशिवाय भरायचे नाही, जर टेंडर भरले तर केलेल्या कामांची चौकशी लावली जाईल, अशी दमबाजी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एका

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ई-टेंडर मला भेटल्याशिवाय भरायचे नाही, जर टेंडर भरले तर केलेल्या कामांची चौकशी लावली जाईल, अशी दमबाजी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एका ठेकेदाराला केल्याने सोनवणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत़ ठेकेदाराने सोनवणे यांच्याविरुद्घ नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, ठाणे अंमलदाराने तक्रार घेण्यास नकार दिला व साहेबांशी चर्चा करा, असा सल्लाही दिला. तलाठी दीपक हरण यांना मारहाण केल्याचे प्रकरण शांत होत नाही तोच सोनवणे यांनी वैशाखखेडे पिंपळवंडी या त्यांच्याच गावातील ठेकेदार नवनाथ श्यामराव लष्करे यांना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या भ्रमणध्वनीवरून कॉल करून ‘जुन्नर तालुक्यातील कामांसाठी, मला विचारल्याशिवाय निविदा भरायच्या नाहीत़ आधी मला भेटायचे व मगच निविदा भरायच्या, जर न विचारता व न भेटता निविदा भरल्यास तुम्ही केलेल्या कामांची चौकशी लावीन, तुम्ही तीन वर्षांत जी कामे केलीत त्याची सर्व माहिती मी तयार करून ठेवली आहे़ यापूर्वी अशाच दोन पुढाऱ्यांची चौकशी लावली होती, ते पळून गेले. तशीच तुमच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल’ असा दम दिला़ लष्करे ठेकेदारी व्यवसाय करतात. गेल्या दोन वर्षांपासून ई-निविदामार्फत कामांचे टेंडर भरले जाते़ त्यानुसार लष्करे यांनी नुकतेच ई-टेंडर भरणार असल्याचे काही ठेकेदारांना सांगितल्यानंतर, सोनवणे यांनी त्यांना दमबाजी केली. या दमबाजीनंतर लष्करे नारायणगाव पोलीस ठाण्यात सोनवणे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता, ठाणे अंमलदाराने ही तक्रार घेण्यास नकार दिला़ थोरातसाहेबांना भेटा असे सांगितले़ लष्करे यांनी दिलेल्या निवेदनात, सोनवणे यांनी दमबाजी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या दमबाजीच्या भाषेमुळे माझ्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मला काही झाल्यास शरद सोनवणे जबाबदार राहतील असे ते म्हणाले.