शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी - बाळा नांदगावकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 18:12 IST

सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही. आमचं कुठं ही सरकार नसल्याने काही काम नाही,  पण सध्या किमान फेरिवाल्याचा मुद्दा मिळाल्याने भारी काम झालं. 

पुणे - सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही. आमचं कुठं ही सरकार नसल्याने काही काम नाही,  पण सध्या किमान फेरिवाल्याचा मुद्दा मिळाल्याने भारी काम झालं.  परंतु सध्या काही पक्षात वेगळ्याच फेरीवाल्याचा विषय असतो, अशी जोरदार फटकेबाजी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली.

राजकारणासह समाजकारण, सहकार, आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण आणि कर्तृत्वसंपन्न कार्यशैलीचा ठसा उमटविणारे माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाळा नांदगावकर बोलत होते. 

यावेळी नांदगावकर म्हणाले की, शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु शरदरावांच बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोकपण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. पण पवारसाहेब तुम्हाला एक पी (पद्मविभूषण ) मिळाला दुसरा पी (पंतप्रधानपद ) कधी मिळणार असा सवाल देखील उपस्थित केला. त्याच बरोबर तुमचे शिष्य काकडेंच्या वाढदिवसाला मी पुण्यात आलो होतो.व्यासपीठावर संजय काकडे आणि अंकुश काकडे या दोघांकडे पाहत ते पुढे म्हणाले की, संजय काकडे नव्हे तर अंकुश काकडे यांच्या वाढदिवसाला आलो होतो. असं म्हणत त्यांनी खासदार संजय काकडेना टोमणा मारत. राजकारणात पण फेरीवाले असल्याचे सांगत सभागृहात पुन्हा एकदा हशा पिकला. 

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन देशमुख, मदन बाफना, माजी आमदार बाळा नांदगावकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, पंतगराव कदम,मधुकर मोहोळ,अमृत महोत्सव गौरव समितीचे कार्याध्यक्ष दिलीप बराटे, समितीचे अध्यक्ष नानासाहेब नवले, संग्राम मोहोळ, सदानंद मोहोळ, उल्हास पवार, अ‍ॅड. जयदेवराव गायकवाड,वंदना चव्हाण, अंकुश काकडे आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषदाचे अध्यक्ष, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.