शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सत्ता भोगली, मंत्री झाले पण तरीही गुंजवणीचे पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:21 IST

सासवड येथील प्रचार सभेत शरद पवारांची नाव न विजय शिवतारेंवर टीका

पुणे : काही जण पाच वर्षे मुंबईत राहतात, निवडणुका आल्या की गावाला येतात. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत असे सांगून लोकांना भुलावायचे. मुख्यमंत्रीही येतात आणि कौतुक करतात आणि निघून जातात. याला काय अर्थ आहे. गुंजवणी प्रकल्प आम्ही मंजूर केला. ९५ टक्के काम ही पूर्ण केले. पुढे ते दहा वर्षे सत्तेत होते. त्या विभागाचे मंत्री होते. मात्र अजूनही पाणी आले नाही. पुरंदरच्या इतर योजना पुरंदर उपसा जलसिंचन, जानाई शिरसाई योजना, उद्योगवाढीसाठी यांचे योगदान काय? अशी टीका विजय शिवतारे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.दरम्यान, आजच्या सभेच्या गर्दीने आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांचा विजय निश्चित झाला आहे. तरी ही मोठे मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन पवार यांनी केले.सासवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय जगताप, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्त्या डाॅ. शामा मोहम्मद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रचारप्रमुख सुदाम इंगळे, विजय कोलते, शंकरनाना हरपळे, बबुसाहेब माहूरकर, उल्हास शेवाळे, धाडसी मोडक, माणिकराव झेंडे, प्रदीप पोमण, सुनीता कोलते, राहुल गिरमे, ओबीसी सेलचे संजय टिळेकर, सागर जगताप आदी उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. माझ्याकडे आकडेवारी असून दोन वर्षांत ६७ हजार महिलांवर अत्याचार झाला. ही लहान गोष्ट नाही. बेपत्ता होण्याचीही माहिती असून राज्यात ६४ हजार महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. गृहमंत्री ज्या जिल्ह्यातील आहे, त्या नागपुरातील ही नोंद आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना, अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शैक्षणिक संस्था वाढल्या, पण संधी कुठे आहे, नोकरी नाही, रोजगार नाही असे अनेक प्रश्न आहे. हे प्रश्न मांडणं आमचं काम आहे.सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे. त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय. लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभे राहतील, असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्नगेल्या पाच वर्षांत पाण्याचे राजकारण केले नाही. पुरंदर उपसा योजना कार्यक्षमतेने चालविली त्यामुळे उसाचे ५० हजार टनांवरून ७ लाख २५ हजार टनांवर उत्पादन गेले. जलजीवन योजनेचा लाभ तालुक्यातील १०० टक्के गावांना दिला, शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला, शरद कृषी भवन, तलाठी कार्यालय उभी केली. गुंजवणी योजना जुन्या कालव्याप्रमाणेच करण्यासाठी पाठपुरावा केला. रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. विरोधक स्वतःचे पुतळे उभे करायचे म्हणत असून केवळ विकास कामांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. संधी असतानाही त्यांना एकही काम पूर्ण करता आले नाही. दुसरे आदर्श उमेदवार माझ्या निष्ठेवर बोट ठेवतात मात्र त्यांनी किती पक्षांचे फाॅर्म भरले, अधिकारी असताना पुरंदर हवेलीतील किती युवकांना रोजगार दिला असा प्रश्न उपस्थित केला. लोकनेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांचे विचार घेऊन मला पुन्हा प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले.संभाजी झेंडे यांना पवारांचे अल्टिमेटमआमचेच एक सहकारी माजी जिल्हाधिकारी निवडणुकीत उतरले आहे. प्रेक्षकांकडे पाहत शरद पवार यांनी विचारले त्याला आजच्या भाषेत काय म्हणतात, प्रेक्षकांकडून एकच आवाज आला. "गद्दार". यानंतर पुन्हा भाषण सुरू करताना त्यांनी प्रशासकीय काम केले. आम्हाला अभिमान आहे. निवृत्त झाल्यानंतर आपण आमच्याबरोबर आलात. आम्हाला आनंद झाला. समाजात काम करण्यासाठी संधी मागितली. आम्ही ती ही दिली. मात्र विधानसभेला उमेदवारी मागितली. मात्र पुरंदर-हवेलीचा अंदाज घेतला असता गेली पाच वर्षे लोकांच्या संपर्कात असणाऱ्या संजय जगताप यांनाच निवडणुकीत निवडून यायची संधी असल्याचे दिसून आले. आघाडी धर्मानुसार त्यांनाच उमेदवारी देणे हे ही क्रमपात्र होते. शहाण्याने हे समजून घ्यायचे असते. गद्दारीचा शिक्का नको असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आमचं चुकलं असं जाहीर करा, थांबा आणि संजय जगताप यांना पाठिंबा द्या. सन्मान मिळेल, अन्यथा तुमचे तुम्हीच ठरवा. पुरंदरची जनता अंजिरापेक्षाही गोड आहे, अन्यथा खूप खवट ही आहे अशा शब्दात शरद पवार यांनी संभाजी झेंडे यांचे नाव न घेता अल्टिमेटम दिला.