शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे भामा नदी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST

चाकण : चाकण शहरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींचे आणि औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शहरातून जाणाऱ्या ओढ्यात सोडले आहे. हे ...

चाकण : चाकण शहरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींचे आणि औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी शहरातून जाणाऱ्या ओढ्यात सोडले आहे. हे सांडपाणी पठारवाडी मार्गे कौटकरवाडी ते काळुस येथील भामानदी पात्रात सोडले जात आहे. प्लॅस्टिक, वैद्यकीय कचऱ्यामुळे पाण्याला साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगून वर आला आहे. हेच फेसाळलेले सांडपाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे. शिवाय ज्या नागरिकांनी या पाण्याचा वापर केला त्यांना त्वचा रोगाच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे.

चाकण शहरातून जाणाऱ्या या ओढ्यामध्ये लगतच्या ग्रामपंचायतींसह औद्योगिक क्षेत्रामधील काही कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी सोडण्यात येत आहे. हेच पाणी शहरातून पुढे पठारवाडी भागातून काळूस येथे भामा नदीला जाऊन मिळते. काळूस, पठारवाडी, राक्षेवाडी, कौटकरवाडी, टेमगिरेवाडी, खैरेवाडी या भागातील शेतकरी शेतीसाठी हे पाणी वापरतात. फेसाळयुक्त सांडपाणी शेतातील पिकांना वापरल्यावर शेतात काळ्या व हिरव्या रंगाचे केमिकलचे थर साचतात. यामुळे शेतीमाल ही खराब होत आहे.

वाढत्या नागरिकीकरणामुळे सांडपाण्याचा स्रोत मोठा आहे. तसेच वारंवार ओढ्यातील गाळमिश्रीत कचरा काढल्याने ओढ्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यावर ठिकठिकाणी साकव पुल बांधले आहे. पठारवाडी जवळील साकव पुलाजवळ या सांडपाण्याला फेस आला आहे. हेच पाणी पुढे भामा नदीत सोडले जाते. याच पाण्याचा शेतकरी शेती पिकविण्यासाठी करत आहे. या पाण्यावर पिकवलेला भाजीपाला चाकण बाजारात विक्रीला आल्यावर ग्राहकही कुठला भाजीपाला असा प्रश्न विचारतात. पर्यायाने भाजीपाला घेणारा खरेदी करत नाही. तसेच शेतातील पिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या माणसाच्या हातापायाला खाज येणे व त्वचेचे आजार उद्भवू लागले आहेत. जनावरांनाही हे पाणी वापरण धोकादायक झालं आहे.

चाकण नगरपरिषदेने या संदर्भात योग्य ते पाऊल उचलावे, या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शहरातील इतर वापरासाठी उपयोगात आणावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यापूर्वी नगरपरिषदेला पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवून परिसरातील शेतकऱ्यांची शेती विषमुक्त करावी असे मागणी पत्र दिले आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

१४ चाकण

चाकण शहरातून जाणाऱ्या ओढ्यातील पाणी फेसाळले.