शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

अभियांत्रिकीच्या प्रवेशात सावळा गोंधळ

By admin | Updated: July 13, 2016 01:01 IST

जेईई परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून सध्या वंचित ठेवले जात असून, एमएचटी-सीईटी परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना

पुणे : जेईई परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून सध्या वंचित ठेवले जात असून, एमएचटी-सीईटी परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सध्या प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची (एआयसीटीई) मान्यता नसलेल्या महाविद्यालयात राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत सावळा गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे.अभियांत्रिकी, मेडिकल व फार्मसीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाकडून एकच प्रवेश पूर्व परीक्षा (एमएचटी-सीईटी) घेण्यात आली. मात्र, राज्याच्या सीईटी परीक्षेच्या गुणांवर मेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देता नीट परीक्षेच्या आधारेच प्रवेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी, सीईटी परीक्षेबरोबरच जेईई आणि नीट परीक्षेचे महत्त्व अधिक असल्याची खात्री विद्यार्थी व पालकांना पटली. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेचे गुण भरता जेईईचे गुणप्रवेश अर्जात भरले. मात्र, राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम सीईटीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर जेईईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. परिणामी, सध्या जेईईचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.सीईटी परीक्षेत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देणे आवश्यक होते. मात्र, डीटीईने शून्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देता जेईईच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश दिले. परंतु, डीटीईच्या अधिकाऱ्यांना ही बाब उशिरा लक्षात आली. त्यामुळे जीईईच्या गुणांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला देण्यात आलेला प्रवेश रद्द करण्यात आला असल्याचे एसएमएसद्वारे कळविले जात आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांनी दर वर्षी एआयसीटीईची मान्यता घेणे आवश्यक आहे. परंतु, पुण्यातील अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजला एआयसीटीईने चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशास मान्यता दिली नाही. त्यामुळे या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अयोग्य होते. परंतु, डीटीईने या महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले.