शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातशे चौरस फुटांच्या फ्लॅटला मिळकतकर नको, शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:14 IST

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातदेखील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकतकर माफ करण्याची व ५० लाख पुणेकरांंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी त्वरित नियुक्त करण्याची मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महापालिका भवनासमोर आंदोलन केले.

पुणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातदेखील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकतकर माफ करण्याची व ५० लाख पुणेकरांंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी त्वरित नियुक्त करण्याची मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महापालिका भवनासमोर आंदोलन केले. या वेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांना घेराव घातला.शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई, ठाणे महापालिकेतील नागरिकांना शिवसेनेने वचन दिल्याप्रमाणे ५०० चौरस फुटांपर्यंत सदनिकांना पूर्ण मिळकतकर माफी आणि ७०० चौरस फुटांपर्यंत घरांना करसवलत देण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे २०१७मध्ये करमाफीचा ठरावही मंजूर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेदेखील शहरातील ७०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली. शहरामध्ये स्वाइन फ्लू, गॅस्ट्रो, डेंग्यू, रेबिज यासारख्या साथीच्या आजारांमुळे पुणेकर हैराण झाले असताना पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्य प्रमुख मिळत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत पूर्णवेळ आरोग्य प्रमुख न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला. या वेळी शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, महापालिका शिवसेना गटनेते संजय भोसले, सविता मते, संगीता ठोसर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका