शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

डिस्पोजलसाठी स्वतंत्र ‘अ‍ॅप’, सॅनिटरी नॅपकिनबाबत अ‍ॅपद्वारे महिलांना देणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:21 AM

सॅनिटरी नॅपकिनचा कचरा हा शहरांमध्ये मोठी समस्या झाली असून, शहरामध्ये महिन्याला २० लाखांपेक्षा अधिक सॅनिटरी नॅपकिन कच-यांमध्ये टाकले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे - सॅनिटरी नॅपकिनचा कचरा हा शहरांमध्ये मोठी समस्या झाली असून, शहरामध्ये महिन्याला २० लाखांपेक्षा अधिक सॅनिटरी नॅपकिन कच-यांमध्ये टाकले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. योग्य विल्हेवाट न लावल्याने हा सॅनिटरी नॅपकिनचा कचरा घातक ठरत आहे. यामुळे सॅनिटरी नॅपकिनची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे व महिला, मुलींमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात येणार आहे. या अ‍ॅपद्वारे महिलांना एक बटण दाबल्यावर सॅनिटरी नॅपकिन घेऊन जाण्यासाठी संबंधित व्हेंडर घरी येऊ शकणार आहे.शहरात दररोज होणा-या कच-यातील डायपर आणि नॅपकिन्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. शहरात काही संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महिन्याला २० लाख पेक्षा अधिक सॅनिटरी नॅपकिन कचºयांमध्ये फेकले जातात. तर शहरात दररोज निर्माण होणाºया कचºयांमध्ये ३ टक्के म्हणजे तब्बल ४२ टन कचरा हा लहान मुलांचे डायपर आणि सॅनिटरी नॅपकिनचा असतो.परंतु याबाबत महिला, मुलींमध्ये जनजागृती नसल्याने हा कचरा हाताळताना सफाई कर्मचाºयांना स्वत:चे आरोग्य धोक्यात घालावे लागते आहे. वैद्यकीयदृष्ट्या नॅपकिन्स हे जैविक कचºयामध्ये मोडत असले, तरी सध्या घरातल्या रोजच्या कचºयामध्ये हे सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर फेकले जातात.परिणामी वेचकांसाठी ही हाताळणी त्रासदायक ठरते. पावसाळ्यात कचरा ओला झाल्यास प्रचंड दुर्गंधी पसरते. त्यामुळे महिलांना हा कचरा फेकताना जागरूक करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या माहित व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात येणार आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्या परिसरात सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशिन कोठे आहे, एक बटण दाबल्यानंतर संबंधित व्हेंडर हा कचरा घेऊन जाण्यासाठी घरी येईल, अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शहराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रमशहरात दररोज निर्माण होणारा लाखो सॅनिटरी नॅपकिनचा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने डिस्पोजल करण्यासाठी शहरात सर्वत्र मशिन बसविण्यात येणार आहे. परंतु याबाबत महिला, मुलींमध्ये जनजागृती झाली तरच या मशिनचा उपयोग होऊ शकतो. यामुळेच महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या कचºयाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात येत आहे. वाढता सॅनिटरी नॅपकिनचा कचरा भविष्यात शहरासाठी घातक ठरू शकतो. यामुळेच याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्नसुरू आहेत. - राणी भोसले, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा

टॅग्स :Puneपुणे