शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहरात भरवस्तीमध्ये लांडगा शिरल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:01 IST

शहरात लांडगा घुसल्याचे पाहुन अनेकांची बोलतीच बंद झाली.

ठळक मुद्देपकडलेल्या लांडग्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले

बारामती: ‘लांडगा आला रे आला पळा पळा पळा’ ची गोष्ट प्रसिध्द आहे. बारामतीकरांनी या गोष्टीचा अनुभव बुधवारी (दि २१) चक्क मध्यरात्री घेतला. सुरवातीला ‘लांडगा’ आल्याची चर्चा बारामती शहरात पसरली. अनेकांनी ‘लांडगा आला रे आला’ गोष्ट असल्याचे समजुन दुर्लक्ष केले. मात्र, प्रत्यक्ष शहरात लांडगा घुसल्याचे पाहुन अनेकांची बोलतीच बंद झाली. यावेळी या लबाड लांडग्याचा पाठलाग करुन भटक्या कुत्र्यांनी त्याची दमछाक केली. परंतु, शहरातील युवक,प्राणीमित्रांमुळे या लांडग्याला जीवदान मिळाले. बारामती शहरात भरवस्तीमध्ये बुधवारी(दि २१) मध्यरात्री लांडगा शिरल्याने खळबळ उडाली.कसाबगल्ली येथील ‘अलकुरेश’च्या युवकांनी प्रसंगावधान राखुन प्राणीमित्रांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लांडग्याला पकडण्यात आले.गुरुवारी(दि.२२) या पकडलेल्या लांडग्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.लांडग्याला पकडल्यानंतर येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बारामती शहर परिसरात एखादा वन्यप्राणी घुसल्याचा प्रकार घडला आहे. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने हा लांडगा बारामती शहरातील कसाब गल्ली येथील मस्जिदमध्ये शिरला.हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा असल्याचा भास सुरवातीला येथील नागरिकांना झाला. सूक्ष्म निरीक्षणानंतर हा कुत्रा नसुन लांडगा असल्याचे निदर्शनास आले.काहीजण या लांडग्याला लाकडी दांडके हातात घेवून मारण्यासाठी सरसावले. मात्र, तो सुध्दा एक पशु असुन त्याला जगण्याचा अधिकार असल्याची भुमिका येथील परवेज शेख,नदीम कुरेशी,सद्दाम शेख,गौस कुरेशी यांनी घेतली. त्यांनी यादगार सोशन फाउंडेशनचे प्रमुख फिरोज बागवान यांच्याशी संपर्क साधला.बागवान रात्री १२ वाजता या ठिकाणी पोहचले. त्यांनी प्रसंगावधान राखुन रात्रीच नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनचे प्रमुख बबलु कांबळे यांच्याशी संपर्क साधला.कांबळे हे देखील त्यांच्या सहकारी अक्षय गांधी, ऋषीकेश आगवणे,कार्तिक शहा,श्रेयस कांबळे,अक्षद शहा,सचिन कांबळे,सचिन जानराव यांच्यासह याठिकाणी पोहचले.कांबळे यांनी लांडग्याला दोरीच्या साहाय्याने कंबरेचा फास तयार केला.त्याला पिंजऱ्यामध्ये सुखरुप बंद करण्यात यश आले. रात्री उशिरा या लांडग्याला यादगार सोशल फाउंडेशनचे बागवान यांच्याकडे असणाऱ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले.त्याला खाद्य,पाणी उपलब्ध करण्यात आले.लांडगा आल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाला समजल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,अग्निशामक विभागाचे प्रमुख विजय शितोळे,मोहन शिंदे आदी याठिकाणी पोहचले.  

टॅग्स :Baramatiबारामती