शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाणी - चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:40 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस पडला असुन विशेषत: कमी पाऊसाचा जिरायती भागाला सर्वाधिक फटका बसला आहे.

ठळक मुद्देतालुक्याच्या पाणी टंचाईचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला आढावा सध्या तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळ पडण्याची दाट शक्यता

सांगवी : बारामती तालुक्यातील तीन गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरसाठी जिरायती भागातील गावांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. तालुक्याच्या पाणी टंचाईचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आढावा घेतला आहे. जिरायती भागातील पाणी प्रश्न टँकरच्या माध्यमातून मार्गी लावा. हिरवा चारा उपलब्ध तातडीने उपलब्ध करा, अशा सुचना त्यांनी बारामती पंचायत समितीला दिल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस पडला असुन विशेषत: कमी पाऊसाचा जिरायती भागाला सर्वाधिक फटका बसला आहे.पावसाने दडी मारल्याने बारामती तालुक्यात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हवामान खात्याने जरी पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी बारामती तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. मुसळधार पावसाची आजही शेतकºयांसह पाण्याचा तुटवडा जाणवनार्या जिरायत भागातील  नागरिकांना प्रतीक्षा आहे.बारामती  तालुक्यातील पाणी टंचाईबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सभापती संजय भोसले यांच्या कडुन बारामतीत झालेल्या एका बैठकी  दरम्यान  आढावा घेतला. याबाबत अधिक माहिती देताना सभापती संजय भोसले म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही. विशेषत: जिरायती भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. या भागात पुरेसा पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणारा असून, प्राण्यांची  हिरव्या चा-याचा प्रश्न गंभीर होऊ लागला  आहे. सध्या तालुक्यातील देऊळगाव रसाळ, उंडवडी, नारोळी या तिन गावांना पंचायत समितीने टँकरने पिण्याचे पाणी दिले जात आहेत. तर पानसरेवाडी व दंडवाडी या गावांसाठी टँकर सुरु करावेत, यासाठी प्रस्ताव दिले आहेत.........................सध्या तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळ पडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे काही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी पंचायत समिती तत्पर आहे. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अशा गावाला पाणी पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहू.- संजय भोसले सभापती पंचायत समिती बारामती——————————————————  

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारWaterपाणी