शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’ची खुल्या बाजारात विक्री

By admin | Updated: April 2, 2017 02:54 IST

निवडणूक म्हटले की, दक्ष सरकारी यंत्रणा, या यंत्रणेत वापरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व येते. मतपेट्या, तसेच मतदान यंत्रे अत्यंत सुरक्षित ठिकाणी

पिंपरी : निवडणूक म्हटले की, दक्ष सरकारी यंत्रणा, या यंत्रणेत वापरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूला अनन्यसाधारण महत्त्व येते. मतपेट्या, तसेच मतदान यंत्रे अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवून पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर नेणे, उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष यंत्र सील करणे-उघडणे या प्रक्रिया होत असल्याने वापरात येणारी यंत्रणा केवळ निवडणूक आयोगाच्या कडक नियमांखाली अमलात येते. ही वस्तुस्थितीही आहे, परंतु अशा प्रकारची यंत्र केवळ शासकीय यंत्रणेतच उपलब्ध होऊ शकतात, असा नागरिकांचा गैरसमज आहे. ‘ईव्हीएम’ मशीन खुल्या बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. पुणे आणि भोसरी परिसरात ईव्हीएमची विक्री करणारे अनेक वितरक आहेत. इंटरनेटमुळे कसलीही माहिती मिळविणे सहजशक्य आहे. ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन कोणालाही सहज खरेदी करता येते. सहकारी बँका, पतसंस्था, तसेच सहकार क्षेत्रातील अन्य उद्योग या ठिकाणी मतदान घ्यायचे असेल, तर अशा ईव्हीमएम बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. इंटरनेटवर शोध घेतल्यास आपल्या शहरातील आजूबाजूच्या वितरकांची माहिती त्यावर दिली जाते. आॅनलाइन आॅर्डर देऊन अशी मतदान यंत्रे खरेदी करणे शक्य झाले आहे. केवळ महापालिका, जिल्हा परिषद, तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अशी मतदान यंत्रे पहावयास मिळतात. ही यंत्र शासकीय यंत्रणेशिवाय अन्य कोणाला मिळणे अशक्य आहे, असा नागरिकांच्या मनात एक समज निर्माण झाला होता. तो समज खोटा ठरणारा आहे. शासकीय यंत्रणेत पहावयास मिळणारी इव्हीएम यंत्रासारखीच हुबेहूब आणि तशीच कार्यप्रणाली असणारी यंत्रे पुणे, भोसरी येथील वितरकांकडे उपलब्ध आहेत. या मतदान यंत्राची किंमत १० हजारांपासून ते ४१ हजार रुपयांपर्यंत आहे. भोसरीतील एका वितरकाकडे ३५ हजार ५०० रुपयांत ईव्हीएम उपलब्ध आहे. सिंगल वोट की मल्टिव्होट मशिन पाहिजे, अशी विचारणा वितरकांचे प्रतिनिधी करतात. एका मतदान यंत्रावर एकाच व्यक्तीला मत देता येईल, अशा स्वरूपाची, तसेच एकाच यंत्रावर अनेक व्यक्तींच्या नावापुढे मत देता येईल, अशाही स्वरूपाची मतदान यंत्रे आहेत. एवढेच नव्हे, तर संगणक प्रणालीवर आपणास हवा तसा प्रोग्रॅम तयार करण्यासाठी आॅनलाइन इलेक्ट्रॉनिक सर्किटही मागविता येते. (प्रतिनिधी)