शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या सक्तीने होतेय तारांबळ

By admin | Updated: January 11, 2017 02:52 IST

शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सोमवार, दि. ९ पासून वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत स्वत:च्या मोबाइलमध्ये सेल्फी काढून ती अन्ड्रॉइड अ‍ॅप उपस्थितीद्वारे अपलोड करून सरकारला

कामशेत : शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार सोमवार, दि. ९ पासून वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत स्वत:च्या मोबाइलमध्ये सेल्फी काढून ती अन्ड्रॉइड अ‍ॅप उपस्थितीद्वारे अपलोड करून सरकारला सादर करावयाची आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना त्रास होत असून, मावळातील बऱ्याच शिक्षकांमध्ये या विषयी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. मावळ तालुक्यातील बऱ्याच शिक्षकांकडे मल्टिमीडिया मोबाइल नसून, अनेकांना तो वापरण्याचे ज्ञानही नसल्याचे समोर येत आहे. त्यांना तो खरेदी करण्याची व वापर करणे शिकण्याची वेळ आली आहे. तसेच दर सोमवारी शासनाला वर्गातील दहा विद्यार्थ्यांचे गट करून सेल्फी व पटसंख्या संदर्भातील इतर माहितीसाठी दोन तास लागणार असल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, हा मोठा प्रश्न समोर येत आहे. या व्यतिरिक्त तालुका कृषिप्रधान, ग्रामीण असल्याने येथे अनेक अडचणी नेहमीच असतात. यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, न पोहोचलेले नेटवर्क या महत्त्वाच्या समस्यांव्यतिरिक्त इतर अनेक समस्या असताना शासनाच्या या निर्णयाचे अनेक शिक्षक अप्रत्यक्ष विरोध करीत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कामाव्यतिरिक्त शिक्षकांना अनेक इतर कामे शासन कायमच देत असून, त्यात नवीन सेल्फीचे प्रकरण समोर आल्याने सर्वसामान्य शिक्षक धास्तावला आहे. दप्तराच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचा व शासनाच्या विविध कामांच्याखाली शिक्षकांचा जीव गुदमरू लागला असल्याचे अनेक तज्ज्ञ शिक्षक सांगत आहेत. सरासरी शाळेची संपूर्ण पटसंख्या पाहिली तर कामशेत शहरातील पंडित नेहरू विद्यालयाची सरासरी पटसंख्या २२०० असून १० विद्यार्थ्यांच्या गटाचा एक सेल्फी याप्रमाणे २२० सेल्फी काढावे लागणार आहेत. शिवाय ते मोबाइलची जीपीएस सिस्टीम सुरु करून काढावयाचे असल्याने अँड्रॉइड उपस्थिती या अ‍ॅपद्वारे शासनाला पाठवायचे आहेत. (वार्ताहर)