शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान टेकडीवर साकारणार ‘स्वयम’ फॉरेस्ट पार्क

By admin | Updated: May 22, 2017 06:44 IST

वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून पुणे शहरातील टेकड््यांचा त्यासाठी वापर करण्यात येणार आहे. हनुमान टेकडीवर वनविभागामार्फत ‘स्वयम फॉरेस्ट पार्क’

लक्ष्मण मोरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

वन पर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून पुणे शहरातील टेकड््यांचा त्यासाठी वापर करण्यात येणार आहे. हनुमान टेकडीवर वनविभागामार्फत ‘स्वयम फॉरेस्ट पार्क’ साकारण्यात येणार आहे. याठिकाणी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्वयम’ या लघू उपग्रहाची प्रतिकृती ठेवण्यात येणार असून, त्याभोवती बाग, अ‍ॅम्फी थिएटर आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचा वनविभागाचा मानस आहे. शहराच्या दृष्टीने भूषणावह ठरणारा हा प्रकल्प राबवण्यासाठी सीओईपीशी प्राथमिक बोलणी झाली आहेत. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर टेकड्या आहेत. वृक्षराजींनी समृद्ध असलेल्या वन क्षेत्रावर दूरदृष्टी ठेवून नियोजनबद्ध रीतीने वन पर्यटन आणि नागरी वनीकरण यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहराच्या लौकिकात भर टाकणारा स्वयम लघू उपग्रहाचा विसर पुणेकरांना पडू नये यासाठी त्याचे स्मारकाच एक प्रकारे उभारले आहे. सर्वांना त्यापासून कायम प्रेरणा मिळावी आणि वन पर्यटनाला वाव मिळावा हा उद्देश वनविभागाने डोळ्यांसमोर ठेवला आहे. वर्षभरापूर्वी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘पीएसएलव्हीसी -३४’ हा प्रक्षेपक स्वयमसह एकूण २० उपग्रह घेऊन अवकाशात झेपावला होता. सीओईपीच्या १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी गेल्या आठ वर्षांपासून हा उपग्रह तयार करण्यासाठी कष्ट घेतले होते. आठ वर्षांपूर्वी सीओईपीच्या एका विद्यार्थ्याने तत्कालीन संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या समोर मांडलेली कल्पना साकार झाली होती. हनुमान टेकडीवर स्वयमची प्रतिकृती उभारली जाणार आहे. तेथे पर्यावरण माहिती केंद्र उभारले जाईल, यासोबतच प्रेरणा केंद्रही असणार आहे. सर्वांना बसून कार्यक्रम पाहता आणि सादर करता येतील असे खुले प्रेक्षागृह (ओपन थिएटर) तयार करण्यात येणार आहे. स्वयमच्या शेजारी आणि टेकडीवरच्या खुल्या व निसर्गरम्य परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा माहोल रंगलेला पाहायला मिळेल. लोकसहभागासाठी आवश्यकता वन क्षेत्राला धक्का न लावता हा प्रकल्प राबवला जाणार आहे. टेकडीवर फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. शालेय सहली याठिकाणी येतील, वर्दळ वाढल्यावर आपोआप भुरट्या चोऱ्या, लूटमार असे प्रकार कमी होतील. वनविभागाने मांडलेली ही संकल्पना पथदर्शी आणि अभिनव आहे. स्मार्ट होत असलेल्या पुण्यामध्ये स्मार्ट वन पर्यटन निर्माण करण्यासाठी वनविभागाला लोकसहभाग आणि यंत्रणांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.