शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गोळी झाडून सुरक्षारक्षकाची आत्महत्या

By admin | Updated: April 1, 2017 02:40 IST

वरिष्ठांकडील तक्रारी आणि ड्युटी करण्याच्या कारणावरून दोन बंदूकधारी सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादातून एकाने

वाघोली : वरिष्ठांकडील तक्रारी आणि ड्युटी करण्याच्या कारणावरून दोन बंदूकधारी सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या वादातून एकाने स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना वाघोली येथील साईसत्यम परिसरात असणाऱ्या गोदाम परिसरामध्ये गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. दुसऱ्या सुरक्षारक्षकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तीन महिन्यांपूर्वी याच परिसरात चोरट्यांनी सुरक्षारक्षकाच्याच बंदुकीतून गोळीबार करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती.कृष्णा देविदास जाधव (वय ३२, रा. आपले घर, मूळ पिंपळगाव काजळे, परभणी) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर गजानन मगर (वय ४०, मूळ पिंपळगाव, परभणी) या वाद घालणाऱ्या सुरक्षारक्षकास चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गालगत वाघोली येथील साईसत्यम गोदाम परिसरामध्ये असणाऱ्या एसएसकेए कंपनीचे गोदाम आहे. रात्री आणि दिवसा गोदामाच्या सुरक्षेसाठी वेक्टा सिक्युरिटीतर्फे या ठिकाणी बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री नऊनंतर बंदूकधारी सुरक्षारक्षक कृष्णा जाधव व गजानन मगर यांच्यामध्ये वरिष्ठांकडे केलेली तक्रार तसेच ड्युटी करण्याच्या कारणावरून जोरदार वाद निर्माण झाला होता. जाधव यांनी या वेळी बंदूक स्वत:वर रोखून आत्महत्या करण्याचीदेखील धमकी दिली होती. गोदामातील इतर कामगार आणि सुरक्षारक्षकांनी जाधव याच्याकडील बंदूक हिसकावून घेऊन दोघांची भांडणे मिटवली. वादावादी शांत करण्यात आल्यानंतर मगर त्या ठिकाणाहून निघाले आणि जाधव यांना बंदूक पुन्हा देऊन इतर कामगार परतले. भांडणाचा सर्व प्रकार गोदामातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कामगार जात असतानाच गोदामाच्या मुख्य रस्त्यावर जाधवने त्याच्याकडे असणाऱ्या बोअर ३२च्या बंदुकीतून स्वत:च्या डोक्यामध्ये गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोदाम परिसरात असणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांसमोर आत्महत्येचा प्रकार घडला. इतर सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांना घटनेची माहिती कळविली. लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही व प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविली. यानुसार जाधव यांनी स्वत:हून रागाच्या भरात आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनेच्या तपास केला. गजानन मगरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.कृष्णा जाधवला अंतर्गत वादातून काही महिन्यांपूर्वी मारहाण झाली होती. त्या वेळी प्रकरण मिटविले गेले. मात्र या वेळी झालेल्या भांडणाचा राग अनावर झाल्याने आत्महत्येचे पाऊल उचलले गेले. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी जाधव यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. (वार्ताहर)सुरक्षारक्षकांना प्रशिक्षणाची गरजसाईसत्यमसह वाघोली परिसरामध्ये दोनशे हून अधिक गोदामे आहेत. महत्त्वाच्या वस्तू असणाऱ्या गोदामामध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीकडून केली जाते. एजन्सीकडून सुरक्षारक्षकांचा बंदुकीचा परवाना पाहून तत्काळ कामे दिली जातात. मात्र काम करणारा सुरक्षारक्षक कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतोय, सुरक्षेची काळजी घेण्याचा समर्थपणा, मानसिक परिस्थिती, व्यसनाधीनता, अंतर्गत वाद या गोष्टींकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. कृष्णा जाधव यांनी आत्महत्या केल्यानंतर सुरक्षा एजन्सीकडून होणारा चालढकलपणाही या निमित्ताने समोर आला आहे. त्यामुळे सर्व सुरक्षारक्षकांच्या बंदूक परवान्याची चौकशी करण्याबरोबरच चोख सुरक्षेचे प्रशिक्षण देण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.