शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

महामंडळाचे सत्त्व पणाला, संमेलनाध्यक्षपदाची सन्मानाने निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 03:19 IST

घटनादुरुस्तीचा महत्त्वाचा निर्णय घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नव्या प्रयोगाकडे पाऊल टाकले आहे. संमेलनाच्या

पुणे  -  घटनादुरुस्तीचा महत्त्वाचा निर्णय घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नव्या प्रयोगाकडे पाऊल टाकले आहे. संमेलनाच्या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप, साहित्यकारणापेक्षा सरस ठरणारे राजकारण या निमित्ताने मागे पडेल. महामंडळाने सांस्कृतिक विवेकबुद्धी शाबूत ठेवून नवा प्रयोग पारदर्शी, समाजाभिमुख करावा, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. वाड्:मयीन कर्तृत्वाची श्रेष्ठता आणि ज्येष्ठतेची दखल घेऊन संमेलनाध्यक्षाचे गुणवत्तेचे निकष ठरवले जावेत, असाही सूर यावेळी आळवण्यात आला.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न होता सन्मानाने निवड केली जावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय साहित्य महामंडळाच्या जुलै महिन्यातील बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी महामंडळाने घटनादुरुस्तीमध्ये महत्त्वाचा बदल करून निवडणुकच कायमस्वरूपी रद्द करून टाकली. यवतमाळ येथे होत असलेल्या ९२व्या साहित्य संमेलनापासूनच निवडणूक प्रक्रिया रद्द केली जाणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तातडीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे साहित्यिकांकडून स्वागत केले जात आहे. महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था, समाविष्ट संस्था, संमेलन निमंत्रक संस्था आणि विद्यमान संमेलन अध्यक्ष हे नव्या अध्यक्षासांठी नावे सुचवतील. यातूनच संमेलनाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘स्थितीस्थापकत्व सोडून नवीन प्रयोग करणे गरजेचे असते. त्यातूनच चांगले मार्ग सापडत जातात. या निर्णयाने साहित्य महामंडळाचे सत्व पणाला लागणार आहे. सांस्कृतिक विवेकबुद्धी शाबूत ठेवून यापुढे निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणुकीच्या राजकारणामुळे आजवर अनेक साहित्यिक संमेलनाध्यक्षपदापासून दूर राहिले. ९२ वर्षांच्या इतिहासात केवळ चारच महिला अध्यक्ष होऊ शकल्या. त्यामुळे महिला साहित्यिकांच्या नावांचा विचार व्हायला हवा.’अध्यक्षपद गुणवत्तेच्या निकषावर हवेसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गुणवत्तेच्या निकषावर असावे. आजवर मतदारांनी कौैल दिला त्याप्रमाणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यामुळे कोणावरही अन्याय झाला अथवा लेखिका दूर राहिल्या, असे म्हणता येणार नाही. मात्र, नव्या पद्धतीने सशक्त, लेखनाची गुणवत्ता असणाऱ्या, मराठी साहित्याला पुढे नेणाºया, साहित्याचा गौैरव वाढवणाºया लेखिका, लेखक अध्यक्षपदासाठी निवडले गेल्यास आनंदच होईल.यापूर्वीची निवडणूक प्रक्रिया एकगठ्ठा मतांमुळे सदोष ठरली होती. वादविवाद वाढल्यामुळे घटनादुरुस्तीची गरज होती. आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये किमान १००० मतदारांचा सहभाग असायचा. आता ही संख्या ५०-६० वर येणार आहे. त्यामुळे निवड करताना भांडणे, वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. साहित्य संमेलनाध्यक्षपद मानाने देताना वयाची ज्येष्ठता, ज्ञानाची आणि वाङ्मयीन कर्तृत्वाची श्रेष्ठता, मराठी बहुसांस्कृतिकतेचे मूल्यभान या निकषांचा विचार व्हायला हवा.- डॉ. श्रीपाल सबनीसमहामंडळाचा हा निर्णय अत्यंत आनंदाचा आणि स्तुत्य आहे. महामंडळ पुण्यात असताना आम्हीही यासाठी प्रयत्न केले होते. लेखकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. निवडणुकीच्या वातावरणामुळे लेखिका अध्यक्षपदापासून दूर राहत होत्या. या निर्णयाने त्यांची वाट मोकळी झाली आहे.- डॉ. माधवी वैद्य,महामंडळाच्या माजी अध्यक्षामहामंडळाच्या या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. या प्रक्रियेतील बारीकसारीक गोष्टी नव्या शंकांना जन्म घालतील. मात्र, आजवरच्या बिकट राजकियतेतून बाहेर पडण्याच्या दृष्टीने हा नवा प्रयोग कौैतुकास्पदच आहे. या प्रयोगामध्ये पारदर्शकता, समाजाभिमुखता असावी, अशी अपेक्षा आहे.- राजन खानयवतमाळ येथे होत असलेल्या साहित्य संमेलनापासूनच निवडणूक रद्द करून सन्मानाने अध्यक्षपद बहाल केले जाणार आहे. महामंडळाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.- लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य संमेलनाध्यक्ष

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या