शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन जप्त; चाकणमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:44 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व पुण्याच्या भरारी पथकांनी चाकण येथे केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन, १८५० लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनधिकृत देशी-विदेशी मद्य आणि बियर विक्री करणाऱ्या हॉटेलवर छापा टाकून ११० बॉक्स जप्तहॉटेल मल्हार गार्डन या ढाब्याचा चालक केतन जाचक, पवनकुमार मैनावतला ठोकल्या बेड्या

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व पुण्याच्या भरारी पथकांनी चाकण येथे केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन, १८५० लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली आहे. यासोबतच दुसऱ्या कारवाईमध्ये अनधिकृत देशी-विदेशी मद्य आणि बियर विक्री करणाऱ्या हॉटेलवरही छापा टाकून ११० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत ९ लाख १९ हजार ३५० असून दोघांना अटक करण्यात आली आहे. हॉटेल मल्हार गार्डन या ढाब्याचा चालक केतन राम जाचक (वय २४, रा. विठाई सदन, जाचक वाडा, दत्त मंदिराजवळ, पिंपरी) याच्यासह चाकण येथील पठारेवस्ती येथून गावठी दारुची निर्मिती करणाऱ्या पवनकुमार संजय मैनावत (वय ३४) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अर्जून ओहोळ यांच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली. मोई, चाकण, कुरुळी, निघोजे या परिसरामधील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या हातभट्टी निर्मिती केंद्रांवर तसेच बेकायदेशीरपणे देशी विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या या ढाब्यावर कारवाई करण्यात आली.