शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरी गडावर शिवप्रेमींसाठी चोख आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:23 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही घेतला लाभ : जिल्हा परिषदेचा उपक्रम

जुन्नर : किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या औचित्याने मोठ्या प्रमाणात येणाºया अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, शिवप्रेमी युवक, ज्येष्ठ नागरिक, बालके यांना गडाची चढाई करताना धाप लागणे, उन्हाने चक्कर येणे, हात पाय मुरगळणे, तसेच तत्सम आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात त्यांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता वाटल्यास गडावरच उपचार करता यावेत, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या आरोग्य विभागाने गडावर चढाईच्या मार्गावर दोन ठिकाणी, तर शिवजन्मस्थळ परिसरातदेखील वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी तात्पुरती व्यवस्था केली होती.

आरोग्य व्यवस्थेचा फायदा शिवप्रेमींना तर झालाच, परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनादेखील गड चढत असताना अ‍ॅसिडीटीचा त्रास झल्याने त्यांनी आरोग्य पथकाकडून गोळी घेऊन शिवजयंतीच्या पुढील कार्यक्रमासाठी हजेरी लावली. उच्चपदस्थ अधिकाºयाला त्रास झाला म्हटल्यावर आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी मांढरे यांना होणाºया त्रासाचे कारण जाणून त्यांना अ‍ॅसिडीटीवरील गोळी दिल्यावर त्यांना बरे वाटले. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय दालनात अत्यावश्यक गोळ्या, औषधे, सलाईन, इंजेक्शन, बँडेज, वेदनाशामक गोळ्या; तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा याची उपलब्धता असल्याने सूरज मांढरे यांनी समाधान व्यक्त केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांच्या नियोजनात आरोग्य विभागाची इंगळून, आपटाळे, येणेरे, सावरगाव, येथील ४ वैद्यकीय अधिकारी, २० कर्मचारी गडावर पूर्ण दिवस तैनात होते.गडावर शिवजयंतीच्या दिवशी किती लोक येतात याचा अंदाज घेऊन पुढील वर्षी किती वैद्यकीय पथके गडावर ठेवावीत, सुलभ शौचालयाची तत्सम सुविधा उपलब्ध करावीत, याचा आराखडा तयार करण्यासाठी जुन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला जिल्हा परिषद प्रशानाने गडावर येणाºया शिवप्रेमींची गणना करण्याचे आदेश देण्यात दिले होते. तर, यावर्षी जिल्हा परिषदेने १२0 सुलभ शौचालयांची व्यवस्था केली होती.

टॅग्स :Puneपुणे