शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पुण्यातून उलगडणार अंतरिक्षाचे गुपीत...!; इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्सची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:55 IST

उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी  इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखगोल विज्ञान हा प्रत्येक माणसाच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटकसंस्थेत ९ वर्षापुढील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष संशोधन विषयांचा शिकवला जाणार अभ्यास

अभिजीत डुंगरवाल बिबवेवाडी : शहरातील शैक्षणिक संस्थांमधून कुशल तंत्रज्ञ, अभियंते तयार होत असताना उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड त्यांना असणे गरजेचे झाले आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी  इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल स्पेस सायन्स (आयएएसएस) या संस्थेची पुण्यातील मुकुंद नगर येथे उभारणी करण्यात आली आहे.

खगोल विज्ञान हा केवळ शालेय अभ्यासक्रमात शिकण्याचा किंवा वेधशाळेत अभ्यास करण्याचा विषय नसून हा प्रत्येक माणसाच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. खगोलशास्त्र, खगोल अभ्यास म्हणूनच प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे. आज जगात खगोलशास्त्रात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. नासा, इसा, इस्रो या अवकाश संस्था चंद्र, मंगळ ग्रहीय मोहिमा राबवत आहेत. अवकाशाचे गूढ सातत्याने उलगडले जात आहे. या निमित्ताने भारतभरातील विद्यार्थीदेखील या शाखेकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहत आहेत. विज्ञानप्रसारक म्हणून काम करायचे असल्यास विज्ञान व खगोल विज्ञानाचा पुरेसा अभ्यास करणे गरजेचे असते. प्रथमत: आकाश निरीक्षणाची सवय जडणे अत्यावश्यक आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा निरीक्षणातून, अनुभवातून कायमचे ज्ञान मिळते.

आयएएसएस  या संस्थेत ९ वर्षापुढील विद्यार्थ्यांना अंतरिक्ष संशोधन, निरीक्षण, ग्रह-तारे यांचा अभ्यास, ग्रहणे, धुमकेतू, अवकाशातील आश्चर्य, सूर्यमाला, विश्व, ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू, आकाश दर्शन, उल्कावर्षाव, लघुग्रह, अशनी, ग्रहणे, दुर्बिणींचे प्रकार अशा अनेक विषयांचा अभ्यास शिकवला जाणार आहे. तसेच चित्र व ध्वनिफितीच्या साह्याने विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा प्राचीन इतिहास सांगितला जाणार असून खगोलशास्त्रीय बाबींची उकलही या संस्थेंतर्गत करण्यात येणार आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांना स्वत: चा टेलीस्कोप बनविण्याचे शिकविण्यात येणार आहे. रॉकेट, सॅटलाईट कसे बनते हे दाखवण्यात येत आहे. खगोलशास्त्राविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, या उद्देशाने या संस्थेची  स्थापना करण्यात आली आहे. अंतराळात धाव घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम यानिमित्ताने केले जाणार आहे. दुर्बिणीशिवायही खगोलीय घटनांचे निरीक्षण करता येते. बुध, शुक्र हे ग्रह सूर्यासमोर असताना दिसत नाहीत. परंतु ते नेहमी सूर्योदयापूर्वी पूर्वेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला काही तास दिसतात. नियमित निरीक्षणाने किंवा वार्षिक वेळापत्रकाच्या संदर्भाने आपण ग्रहांच्या उगविण्याची व मावळण्याची वेळ पाहू शकतो. हे दोन्ही ग्रह साध्या डोळ्यांनी पाहू शकतो. दुर्बिण (चार ते पाच इंच व्यासाची) असल्यास शुक्राच्या कळा पाहता येतात. मंगळ, गुरू, शनी हे ग्रहसुद्धा साध्या डोळ्यांनी पाहता येतात. दुर्बिणीने गुरूचे दोन समांतर पट्टे आणि चार उपग्रह पाहता येतात. शनीची रिंग पाहता येते. हे तीनही ग्रह रात्री पूर्वेकडून उगवल्यानंतर मावळेपर्यंत दररात्री पाहता येऊ शकतात. दररोज अवकाशात स्वत: भोवती व सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी, दररोज अवकाशात उगवणारा व मावळणारा सूर्य, कलेकलेने मोठा होत जाणारा चंद्र, सूर्य-चंद्र-ताऱ्यांपासून मिळणारा प्रकाश, गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आणि एकूणच आपल्या दैनंदिन घडामोडी या खगोलीय नियमानुसार घडत असतात. निसर्गाची व मानवाची प्रत्येक हालचाल ही विज्ञानाच्या नियमानुसार नियंत्रित होत असते. म्हणून आपण एकदा विज्ञानाचे नियम समजून घेतले तर आपल्या जीवनात दु:ख, चिंता कमी होऊन आनंद दुणावेल.आपल्यापासून जे लांब असते त्याची आपल्याला उत्सुकता असते. तेथे घडणाऱ्या घडमोडींची माहिती आपल्याला व्हावी असे माणसाला वाटत असते. यातूनच विज्ञान आणि संशोधनाच्या शाखा विकसित होत गेल्या. खगोलशास्त्र हा तर पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय आहे. यातूनच माणूस चंद्र, मंगळ या ग्रहांपर्यंत पोहचू शकला. पण तरीही असे अनेक प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत. अवकाश निरीक्षक बनण्यासाठी विज्ञान शाखेच्या फारशा पदव्यांची गरज नाही. खगोलीय घडामोडी जाणण्याची व पाहण्याची आवड आहे. निरीक्षणासाठी वेळ आहे तो प्रत्येकजण खगोलप्रेमी, निरीक्षक व अभ्यासक बनू शकतो. बहुतांशी प्रगत देशांमध्ये देशाच्या अर्थसंकल्पाच्या सुमारे दोन टक्के हिस्सा हा विज्ञान संशोधनासाठी राखून ठेवलेला असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्रमाण अर्ध्या टक्क्यांच्या आसपास होते. गेल्या काही वर्षांत भारत अनेक नवनवीन वैज्ञानिक महाप्रकल्पांमध्ये सहभागी होत आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये शेकडो कोटी रुपये गुंतवले जात आहेत. आणि त्याचबरोबर सध्याची आघाडीच्या वैज्ञानिकांची पिढी ही हळूहळू निवृत्तीकडे सरकत आहे. त्यामुळे या महाप्रकल्पांचा उपयोग करून घेण्यासाठी देशाला मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिकांची गरज आहे. जे हुशार विद्यार्थी या घडीला संशोधनाचे क्षेत्र निवडतील त्यांना येत्या काही वर्षांत भारतीय संशोधन क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. 

टॅग्स :Puneपुणेscienceविज्ञान