शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईची दुसरी फेरी सोमवारी

By admin | Updated: March 26, 2017 02:06 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची लॉटरी येत्या सोमवारी (दि. २७) काढली जाणार आहे. दुसऱ्या फेरीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी येत्या ३ एप्रिलपर्यंत संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले.शालेय शिक्षण विभागातार्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण १५ हजार ६९३ जागांसाठी ३६ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर पुणे शहर व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील शाळांमधील प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली होती. पहिल्या फेरीतून १३ हजार २४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते. त्यातील ७ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीतून सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. परंतु, हजारो विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण विभागाकडून सोमवारी आरटीई प्रवेशाची दुसरी लॉटरी काढली जाणार आहे. या फेरीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे शाळांची माहिती कळविण्यात येईल. एसएमएस प्राप्त झाल्यानंतर पालकांनी त्वरित संबंधित शाळेशी संपर्क साधून प्रवेश घ्यावा, असे आवाहन शेख यांनी केले आहे. पहिल्या फेरीतून प्रवेश मिळूनही ३ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांशी संपर्क साधला नाही. तर २ हजार ७१ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतला. तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र सादर न केल्याने ३९६ विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आला, असेही शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)