शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध

By admin | Updated: June 8, 2015 06:02 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुण समजणार आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुण समजणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा दुसरा भाग सोमवारपासूनच भरता येईल. विद्यार्थ्यांनी मागील वर्षाचे कट आॅफ विचारात घेवून तसेच माहिती पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करून मगच कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावेत, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून रविवारपर्यंत २५हजारांहून विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून पूर्ण केला आहे. पहिला भाग भरलेला नाही़, अशांना सोमवारी पहिला व दुसरा भाग भरता येणार आहे. यंदा पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांना कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरण्याची संधी दिली आहे. जाधव म्हणाले, ‘‘प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावयाचे आहेत. दहावीचे गुण आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचा मागील वर्षाचा कट आॅफ विचारात घेऊन काळजीपूर्वक पसंती क्रम भरावेत. प्रत्येकाने किमान ५० महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरणे बंधनकारक आहेत.प्रामुख्याने विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते. काही वर्षांपासून केवळ नामांकित महाविद्यालयांतील कला शाखेच्या सर्व जागांवर प्रवेश होत आहेत. इतर महाविद्यालयातील कला शाखेच्या जागा रिक्त राहतात. त्यामुळे योग्य शाखेची निवड करा.अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सीबीएससी, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई आणि महाराष्ट्राबाहेरील बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.विद्यार्थी व पालकांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या केंद्रांना भेट देता येईल. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज,नेस वाडिया कॉलेज आणि पिंपरी येथील जयहिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या केंद्रांवर संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे दूरध्वनी क्रमांक माहिती पुस्तकात प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यामुळे इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या माहितीसाठी या केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा.प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा आपल्या शाळेतून मार्गदर्शन केंद्रावरून माहिती पुस्तिका खरेदी करा.नमुना अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.माहिती पुस्तिकेमध्ये लॉग इन आयटी आणि पासवर्ड दिलेले आहेत. http://pune.fyjc.org.in या वेबसाईटवर जा. पहिल्यांदा लॉन-इन करण्यसाठी लॉग-इन आयडी आणि पासर्वड वापरा.पासवर्ड बदला आणि पुढच्या वेळेस लॉग इन करण्यासाठी लक्षात ठेवा.सिक्यूरिटी प्रश्न निवडून तसेच त्याची योग्य उत्तरे लक्षात ठेवा.सोक्युरिटी प्रश्न व पासवर्ड यांची प्रिंट आऊट घ्या.संगणकावर दिलेल्या सूचना पाळून टप्प्याटप्य्याने आॅनलाईन अर्ज भरा.कन्फर्म या बटनावर क्लिक करून आपला अर्ज निश्चित करा.प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा पसंतीक्रम निश्चित करताना शाळा/ कॉलेजचे गेल्या वर्षाचे कट आॅफ पहा .आपणास मिळालेले गुण, शाखा, अनुदानित / विनाअनुदानित, शुल्क, माध्यम, शिकविले जाणारे विषय तपासा.आपल्या निवासापासूनचे अंतर येण्याजाण्याची सोय विचारात घ्या.प्रवेश घ्यावयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंती क्रम (कॉलेज कोड) निश्चित करा.निश्चित केलेल्या पसंतीक्रमांचा प्राधान्य क्रम ठरवून घ्या.ठरविलेल्या प्राधान्यक्रमानुसार कॉलेज कोड अर्जात भरा.मित्रांनी भरलेले पसंतीक्रम भरू नयेत.मिळालेल्या गुणांचा विचार करून पसंतीक्रम भरावेत.