शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पूना क्लब संघाचा सलग दुसरा विजय

By admin | Updated: April 26, 2017 04:07 IST

फरांदे क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित १६ वर्षांखालील आंतरअकादमी स्पर्धेत पूना क्लब आणि क्रिकेट मास्टर क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेत सलग

पुणे : फरांदे क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित १६ वर्षांखालील आंतरअकादमी स्पर्धेत पूना क्लब आणि क्रिकेट मास्टर क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला.विधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ऋषीकेश गेंड याने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर क्रिकेट मास्टर क्लबने ओम क्रिकेट अकादमीचा २३ धावांनी पराभव केला. सामन्यामध्ये क्रिकेट मास्टर क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २५ षटकांत ७ गडी बाद १६७ धावा केल्या. प्रथमेश कारंडे (२०), सानिध्य वेलणकर (५६), ऋषीकेश गेंड (४०) व आदित्य मोरे (१९) यांनी संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली.या आव्हानाला उत्तर देताना ओम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव २४.३ षटकांत व १४४ धावांवर संपुष्टात आला. रितेश देशमुख (२८), मनोज निगडे (२६), प्रेम भालेराव (३१), अविनाश क्षत्रीय (१५) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. आरशिन कुलकर्णी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने फरांदे क्रिकेट क्लबचा १० गडी राखून दणदणीत पराभव केला. फरांदे सीए संघाने पहिल्यांदा फलंदाजी घेतली; पण त्यांचा डाव स्थिरावलाच नाही. पूना क्लबच्या गोलंदाजीसमोर फरांदे संघाला १७.२ षटकांत ७२ धावाच करता आल्या. पूना क्लबकडून दीपक शर्मा याने ६ धावांत ३, तर आरशीन कुलकर्णी याने १० धावांत ४ व राज नवले याने ४ धावांत २ गडी टिपून झटपट संघ गुंडाळला. पूना क्लबने ही धावसंख्या ५.५ षटकांत व एकही गडी न गमावता पूर्ण केली. प्रथमेश भोपळे (नाबाद ३७) व कपिल देडगे (नाबाद १९) यांनी संघाला नाबाद विजय मिळवून दिला.संक्षिप्त धावफलक : गटसाखळी फेरी :क्रिकेट मास्टर क्लब : २५ षटकांत ७ बाद १६७ (प्रथमेश कारंडे २०, सानिध्य वेलणकर ५६, ऋषीकेश गेंड ४०, आदित्य मोरे १९, शुभम सोन्ने २-२३) वि.वि. ओम क्रिकेट अकादमी : २४.३ षटकांत १० गडी बाद १४४ धावा (रितेश देशमुख २८, प्रेम भालेराव ३१, वरद जोशी ४-२२, आदित्य मोर२-४१).फरांदे क्रिकेट क्लब : १७.२ षटकांत सर्व बाद ७२ (दीपक शर्मा ३-६, आरशीन कुलकर्णी ४-१०) पराभूत वि. पूना क्लब: ५.५ षटकात बिनबाद ७५ (प्रथमेश भोपळे नाबाद ३७).