शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाती सील केल्याने दूध उत्पादक, संस्था अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:40 IST

सहकारी दूध संस्थांची बँकेतील खाती सील करून ठेवल्याने भोर तालुक्यातील अनेक दूध उत्पादक शेतकरी व सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत.

भोर : शेतकऱ्यांची पीककर्जाची थकबाकी जमा करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतक-यांची व सहकारी दूध संस्थांची बँकेतील खाती सील करून ठेवल्याने भोर तालुक्यातील अनेक दूध उत्पादक शेतकरी व सहकारी दूध संस्था अडचणीत आल्या आहेत. यामुळे शेतकरी बँकेच्या अन्यायकारक कारभाराबद्दलनाराजी व्यक्त करीत असून बँकेने हे थांबवले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.भोर तालुक्यात ७५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून या संस्थांच्या माध्यमातून सुमारे ६० हजारपेक्षा अधिक शेतकरी सभासद असून यातील ९० टक्के शेतकºयांनी विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून पीक कर्ज घेतले आहे, तर ४५ ते ५५ सहकारी दूध संस्था आहेत. मात्र राज्य शासनाने २०१७ पर्यंत शेतकºयांनी घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर अद्यापपर्यंत कोणताच निर्णय झाला नसून पीक कर्ज माफ केलेले नाही. त्यामुळे जिल्हा बँकेची कर्जवसुली थांबल्याने बँकेची थकबाकी वाढत चालली आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या प्रशासनाने जिल्हा बँकेतील पीक कर्जाची थकबाकी असलेल्या दूध उत्पादक शेतकरी व सहकारी दूध संस्थांची खाती सील करून ठेवली आहेत.>कर्जाची वसुली दूधसंकलनाच्यआ पैशातूनशेतकºयांनी कार्यकारी संस्थांकडून दूध पीक कर्ज घेतले आहे. मात्र, शासनाने २०१७ पर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केल्याने कर्जाची परतफेड झालेली नाही. जिल्हा बँकेच्या प्रशासनाने शेतकरी आणि दूध संस्थांची खाती सील केली आहेत. अनेक शेतकºयांची कुटुंबे दूधउद्योगावरच चालत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.>शेतकºयांच्या पीक कर्जाची वसुली त्यांच्या शेतीच्या किंवा इतर उत्पन्नातून घ्यावी. याची वसुली दूध उत्पादनातून आलेल्या पैशातून करण्यासाठी शेतकºयांची खाती सील करणे योग्य नाही, याबाबत उद्या जिल्हा बँकेच्या बैठकीत विषय मांडून शेतक ºयांना न्याय देऊ.- संग्राम थोपटे, आमदार