शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य महोत्सवाचा पडदा बुधवारी उघडणार

By admin | Updated: June 9, 2015 05:30 IST

लोकमत वृत्तपत्रसमूह आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने प्रथमच होणाऱ्या नाट्य महोत्सवाचा पडदा बुधवारी (दि. १०) उघडणार आहे.

पिंपरी : लोकमत वृत्तपत्रसमूह आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने प्रथमच होणाऱ्या नाट्य महोत्सवाचा पडदा बुधवारी (दि. १०) उघडणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १० ते १३ जूनला होणाऱ्या महोत्सवात रंगभूमीवरील चार विविध व्यावसायिक, प्रायोगिक नाट्यप्रयोग पाहण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे. नाट्यरसिकांसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे. सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळे नाट्य क्षेत्रात उत्साह संचारला आहे. नाट्यक्षेत्रातील मान्यवर दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. तिकीट विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाचला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाट्य, चित्रपट कलावंत मोहन जोशी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर जोशी यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध निवेदक राजेश दामले घेणार आहेत. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, नाट्य परिषदेचे सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष राजेशकुमार सांकला, उद्योजक आर. डी. देशपांडे, क्रेडाईचे उपाध्यक्ष अनिल फरांदे, उद्योजिका जयश्री फडणवीस, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आनंद म्हसवेकर दिग्दर्शित ‘मदर्स डे’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. त्यात सुहिता थत्ते, सुप्रिया पाठारे, स्मिता सरवदे, पौर्णिमा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यानंतर पुढील तीन दिवस दररोज सायंकाळी साडेपाचला नाट्यप्रयोग होतील. ११ जूनला सादर होणाऱ्या संतोष रासने दिग्दर्शित ‘सवत तुझी लाडकी ग’ या नाटकात संतोष रासने, देवेंद्र भिडे, सोनाली, नितीन धायकर, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १२ जूनला सादर होणाऱ्या कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकात शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, जयंत घाटे, सुचेत गवई, ज्ञानदा पानसे यांच्या, तर १३ जूनला होणाऱ्या देवेंद्र पेम दिग्दर्शित ‘आॅल दि बेस्ट’ या नाटकात मयूरेश पेम, अभिजित पवार, सनी मुनगेकर, खशबू तावडे यांच्या भूमिका आहेत. शहरातील विविध केंद्रांवर प्रवेशिका उपलब्ध आहेत. सादर होणाऱ्या चारही नाटकांसाठी एकूण प्रवेशमूल्य १२०० रुपये असून, महोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने रसिकांसाठी खास सवलत योजना राबविली आहे. ही चारही तिकिटे केवळ तीनशे रुपयांत मिळणार आहेत. नाट्य महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन लोकमत परिवाराने केले आहे. पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअरमधील तळमजल्यावरील ‘लोकमत’च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयातही तिकिटे उपलब्ध आहेत. या उपक्रमाचे सहप्रायोजक फरांदे स्पेसेस आणि आऊटडोअर पाटर्नर बिग इंडिया ग्रुप आहे. (प्रतिनिधी)