शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्कूल आॅफ प्लॅनिंग’ पुण्यातच! मुख्यमंत्र्यांचे जावडेकरांना पत्र; संस्था औरंगाबादला जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 02:38 IST

केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल्याचे समजते.

- राजानंद मोरेपुणे : केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे ही संस्था औरंगाबादला जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत काही वर्षांपासून देशभरात विविध ठिकाणी ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ची उभारणी करण्याचे धोरण आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्येही या संस्था सुरू करण्याचे नियोजन होते. त्याअनुषंगाने आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संस्था पुण्यात सुरू करण्याबाबत केंद्र सरकारला १७ जुलै २०१३ रोजी प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी १३ एकर जागा देण्याबाबतही अनुकूलता दर्शविण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत पुण्यात संस्था सुरू करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच युती सरकार आल्यानंतर ही संस्था पुण्यातून औरंगाबादला हलविण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी एकत्रित येत ही संस्था पुण्यातच व्हावी यासाठी जोरदार पाठपुरावा केला. औरंगाबादपेक्षा पुणे हे संस्थेसाठी योग्य ठिकाण असल्याचे तज्ज्ञांकडून पटवून देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ही संस्था पुण्यातच सुरू करण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे आग्रह केला आहे. संस्थेसाठी जागाही प्रस्तावित असून ती मुंबई, अहमदाबाद व बंगळुरू या शहरांच्या जवळ आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने स्कूल आॅफ प्लॅनिंगची नितांत गरज आहे. त्यामुळे राज्याचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक हब असलेल्या पुण्यात ही संस्था उभारावी, असे या पत्रात म्हटले आहे.स्मार्ट सिटीसारखी योजना प्रत्यक्षात येत असताना देशात सध्या नगररचना क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. नगररचनाकारांची गरज लक्षात घेऊन ही संस्था तातडीने होणे आवश्यक आहे. संस्थेसाठी आवश्यक जागा, वातावरण तसेच आवश्यक तज्ज्ञांची उपलब्धता सहज होऊ शकते. या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाºया विद्यार्थ्यांसाठीही पुणे सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे इतर ठिकाणांचा विचार होणार आहे. संस्था लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. - रामचंद्र गोहाड, ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणे