शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबस चालकाचा सुतारद-यात खून ,कारण अज्ञात, घरापासूनच काही अंतरावर आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:38 IST

कर्वेनगर : कोथरूडमधील सुतारदरा परिसरात एका वाहनचालकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कर्वेनगर : कोथरूडमधील सुतारदरा परिसरात एका वाहनचालकाचा मृतदेह आढळल्याने परिसरातखळबळ उडाली आहे. मात्र त्याचा मृत्यू डोक्यात दगड घातल्यामुळे झाला असावा, असा कोथरूड पोलिसांचा संशय आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोथरूड प़ोलिसांनी दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम बसप्पा घाटगे (वय ३९, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे, मूळ रा. बागलकोट, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. आज सोमवारी सकाळी १० वाजता घरापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत नागरिकांनी तातडीने कोथरूड पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने घोषित केले.दरम्यान, खून कशामुळे झाला, याविषयी अद्याप काहीही अधिकृत माहिती मिळाली नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. परशुराम घाटगे त्याच परिसरातील रहिवासी असून, तो एका खासगी शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. शनिवारी (दि. २१) रात्री तो घरातून गेला होता आणि आज त्याचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह आढळलेल्या ठिकाणी काल रात्री पार्टी झाली असल्याचे दिसते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे पार्टीमधून काही झाले का, यादृष्टीनेदेखील पोलीस तपास करत आहेत.ज्या ठिकाणी परशुराम घाटगे याचा मृतदेह आढळला त्या परिसरात रात्री अनेक जण दारू पीत बसलेले असतात. तो एक प्रकारे अड्डा झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले.सुतारदरा परिसरातून अवैध दारू विक्री चालते तिथून दारू आणायची किंवा विदेशी दारू आणून या मैदानात पीत बसण्याचे अनेकांचे उद्योग आहेत. त्यातून अनेक वेळा भांडणे, मारामाºया होत असतात. त्या वेळी या भागातून जाणाºया महिला आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. याबाबत पोलिसांना सांगूनदेखील काहीही कारवाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.

टॅग्स :Murderखून