शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

खेड तालुक्यात १२९ विद्यार्थ्यांना आठ लाखांची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर: खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरूनगर: खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सावित्रीबाई फुले, शारदाबाई पवार, साहेबराव बुट्टेपाटील आणि दत्तात्रेय वळसेपाटील यांच्या नावाने गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या माध्यमातून मागील दोन वर्षातील १२९ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजारांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक कोंडीभाऊ टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, लालचंद कर्नावट, ॲड. माणिक पाटोळे, सुभाष टाकळकर, प्राचार्य डॉ.व्ही.डी.कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य एस. एन. टाकळकर, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.

या शिष्यवृत्तीसाठी गुणवंत परंतु आई-वडील नसलेले, मागास प्रवर्गातील, आदिवासी, अंध-अपंग, आर्थिक दुर्बल तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अंतर्गत ४६ विद्यार्थिनींना सुमारे २ लाख ९२ हजार, शारदाबाई पवार शिष्यवृत्ती अंतर्गत ४५ विद्यार्थिनींना सुमारे ३ लाख १८ हजार, साहेबरावजी बुट्टेपाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना ९२ हजार तसेच दत्तात्रेय वळसे पाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना सुमारे १ लाख ३० हजार असे एकूण ८ लाख ३३ हजार रूपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत ८ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश सुपूर्द करण्यात आला.

नुकतेच सीएची परीक्षा उत्तीर्ण झालेला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सागर पिंगळे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत अकौन्टसी विषयात सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थिनी आकांक्षा वाडेकर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ॲड. माणिक पाटोळे, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, धर्मराज पवळे, सी.ए. सागर पिंगळे, आकांक्षा वाडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक यांनी तर आभार प्रा. एस. एन. टाकळकर यांनी मानले.

फोटो ओळ : शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टेपाटील व पदाधिकारी.