शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

यूपीएससीसाठी शिष्यवृत्तीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 03:04 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत अखिल भारतीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या निवडीचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने राज्य शासनातर्फे गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत अखिल भारतीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या निवडीचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने राज्य शासनातर्फे गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. शासनातर्फे तीन स्तरात ही शिष्यवृत्ती राबविली जाणार असल्याचे अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाकडून राज्यात मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नाशिक या ६ ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या संस्थांमधून प्रत्येक वर्षी सुमारे ६०० उमेदवारांना विद्यावेतन, मार्गदर्शन वर्ग, वसतिगृह, ग्रंथालय आदी सुविधा पुरविल्या जातात. मात्र, भारतीय प्रशासकीय सेवेत राज्यातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने शासनाने यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांना मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्थसाहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील गुणवान व होतकरू उमेदवारांसाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना राबविली जाणार आहे.उमेदवारांना मुलाखतीपर्यंतच्या कालावधीसाठी दिल्ली येथील निवडक प्रशिक्षण वर्गांमध्ये उपलब्ध अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. उमेदवारास भाग१, भाग २, भाग ३ या या योजनेचा लाभ एकदाच दिला जाईल. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास यूपीएससीची संबंधित परीक्षा देणे बंधनकारक असेल, अन्यथा शिष्यवृत्तीची रक्कम एकरकमी शासनास परत करण्याचे बंधनपत्र उमेदवारास लिहून देणे आवश्यक राहील, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)निकषांची पूर्तता करणे आवश्यकशिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवारांना शासनाने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. केवळ महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या उमेदवारास या योजनेचा लाभ घेता येईल. उमेदवाराचे व त्याचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पादन १० लाखांपर्यंत असावे. मागील तीन वर्षांमध्ये किमान एक वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या मात्र भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड न झालेले उमेदवार, या योजनेसाठी अर्ज करू शकतील. उमेदवारांना पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, केंद्रीय लोकसेवा अयोगाच्या परीक्षेची गुणपत्रिका आदी कागदपत्रे सादर करावी लागतील.