शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती बसस्थानकातील वेळापत्रक कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 23:05 IST

गैरसोयीचा प्रवाशांना फटका : सोयी-सुविधांचाही अभाव

सांगवी : बारामती बसस्थानकातून सुटणाऱ्या बसचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, कोणत्याच बस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची पुरती तारांबळ उडाली आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या तिजोरीत जास्तीत जास्त वाढ कशी होईल, यासाठी मोठ्या जोमाने प्रयत्नशील राहून काम करत आहे, तर दुसरीकडे बारामती आगाराच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बारामती आगारात खासगी वाहतूक घुसखोरी करत प्रवाशांना बाहेर घेऊन जात आपल्या खासगी वाहनांतून प्रवाशांना पाहिजे तिथे सोडत आहेत. यामुळे परिवहन महामंडळाच्या खिशाला एकप्रकारे कात्रीच लावण्याचा प्रकार समोर येत आहे.

बारामती बस स्थानकात दररोज हजारो प्रवाशी ये-जा करत असतात. त्यातही अनेक मार्गांवरील एसटी बस वेळेवर येत नसल्याने प्रवासी ताटकळत बसत असल्यामुळे नाईलाजास्तव खासगी वाहनांचा पर्याय अवलंबत आहेत. तसेच एसटीत बसलेल्या प्रवाशांना त्रास होऊ नये,यासाठी फेरीवाल्यांना एसटीमध्येच जाऊन खाद्यपदार्थ व पेय विक्रीस मनाई करण्यात आली आहे.असे असतानादेखील यावर बंदी घालण्यास अधिकारीवर्ग अपयशी ठरत आहेत. यामुळे बारामती आगाराचे अधिकारी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनासयेऊ लागले आहे. प्रवाशांची हेळसांड व गैरसोय रोखण्यासाठी आगारप्रमुख काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.प्रसाधनगृहात महिलांकडूनही आकारले जातात पैसे...४शासनाने प्रत्येक बसस्थानकात महिलांसाठी प्रसाधनगृहात मोफत सुविधा दिली जाते. मात्र, बारामतीच्या आगारातील प्रसाधनगृहात लांब पल्ल्याच्या प्रवाशी महिलांकडून पैसे आकारले जात आहेत, पैसे घेण्यासाठी बसलेला कामगार महिलांकडे पैशाची मागणी करत असल्याने महिला नाईलाजाने पैसे काढून त्यांच्याकडे सोपवतात, तर याठिकाणी महिलांना मोफत सुविधा असल्याचा बोर्ड अद्यापही लावण्यात आला नाही, तर नवीन येणाºया पुरुषांकडूनदेखील ठरविल्याप्रमाणे जास्तीचे पैसे आकारले जात आहेत, याच ठिकाणी फेरीवाले व स्थानिक लोकांना त्याठिकाणी बसविण्यात येते, यामुळे काही महिलांना नाहक त्रासही जाणवत असतो, याबाबत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास या गोष्टी आणूनदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.बारामती आगारात येणाºया खासगी वाहतूक करणाºयांना वारंवार हाकलून देत आहोत. प्रसाधनगृहात महिलांना मोफत सुविधा असून, या अगोदर पैसे घेत असल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. या पुढे सूचना देऊन संबंधित पैसे घेताना निदर्शनास आल्यास कारवाई करू.- अमोल गोंजारी, आगार प्रमुख बारामती 

टॅग्स :Bus DriverबसचालकBaramatiबारामती