पुणे : शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात उद्भवलेल्या कचरा समस्येचा आणखी एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला असून, या दोन महिन्यांत शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे श्वानदंशाचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांनी वाढले आहे. दरमहा सरासरी १ हजार श्वानदंशाच्या घटना घडत असताना, या दोन महिन्यात हा आकडा सरासरी १५५० च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभागही हतबल झाला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील कचरा उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर येऊ देण्यास फुरसुंगी आणि देवाची उरुळी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी बंदी घातली होती. हे आंदोलन ८ जानेवारी रोजी ग्रामस्थांनी मागे घेतले. त्यानंतर फेबुवारी अखेरपर्यंत महापालिकेकडून या डेपोवर एकही गाडी न पाठविता शहरातील कचरा शहरातच जिरविला जात होता. त्यामुळे कचराकुंड्या जवळपास दोन महिने ओव्हर फ्लो होत्या. महापालिका प्रशासनाच्या मते शहरात सुमारे ४५ ते ५० हजार मोकाट कुत्री असून, त्यांच्या उपद्रवामुळे दरमहा सरासरी १ हजार श्वानदंशाच्या घटना होतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांत हे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे.शहरात गेल्या दोन महिन्यांपासून श्वानदंशाचे प्रकार वाढले आहेत. ही बाब लक्षात आल्याने ही कुत्री पकडण्यासाठीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गेल्या दोन महिन्यांत अडीच हजार कुत्री पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली अहे. तसेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रेबीजची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.- डॉ. अंजली साबणे ( सहायक आरोग्य प्रमुख )च्महापालिकेकडून श्वानदंशांची लस पालिकेच्या काही रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. दर महिन्यास श्वानदंशाच्या सरासरी १ हजार घटना घडत असल्याने त्या अनुषंगाने या रूग्णालयामध्ये रेबीजची लस उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, रूग्णांची संख्या अचानक वाढल्याने या लशीचा तुटवडा जाणवू लागल्याचेही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच ही वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्व रुग्णालयांमध्ये रेबीजसाठी लशीचा पुरेसा पुरवठाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.मागील चार महिन्यांतील आकडेवारी नोव्हेंबर २०१४ - १०४५डिसेंबर २०१४- १०४१जानेवारी २०१५- १५१६फेब्रुवारी २०१५ - १५६३
शहरात मोकाट कुत्र्यांची धास्ती
By admin | Updated: March 15, 2015 00:31 IST