शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सयाजीरावांचा पत्रप्रपंच अभ्यासक्रमात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 02:28 IST

बारा खंड प्रकाशित : जगभरातील जाणकारांशी पत्रव्यवहार

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड हे पुरोगामी दृष्टीचे संस्थानिक, कलासक्त राजे आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या समाजाभिमुख कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सयाजीरावांचा जीवनप्रवास अधोरेखित करणारे ५० खंडांवर चरित्र साधन समितीचे काम सुरू आहे. त्यापैकी १२ खंड बडोदा येथील साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले असून, उर्वरित १३ खंडही प्रकाशित होत आहे. ११ मार्च रोजी सयाजीरावांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा पत्रप्रपंच आणि भाषणे अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावीत, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय चरित्र साधन समितीने घेतला आहे. यासंदर्भात, विनोद तावडे यांच्याशी प्राथमिक स्तरावरील चर्चा झाली असून, पाठ्यपुस्तक मंडळाकडे लवकरच हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून कायमच जनकल्याण आणि लोकसेवेचा ध्यास घेतला. मोफत आणि सक्तीचे शिक्षण, ग्रंथालयांना प्रोत्साहन, कलांना राजाश्रय, जनतेचा सर्वांगीण विकास या मुद्द्यांवर त्यांनी कायम लक्ष केंद्रित केले. इतिहास, राजकारण, कला अशा विविधांगी विषयांवर त्यांनी जगभरातील अनेक जाणकारांशी पत्रव्यवहार केला. विविध परिषदांमधील भाषणांमधून त्यांनी आपल्या दूरदृष्टीचे दर्शन घडवले. शालेय अभ्यासक्रमात इयत्ता चौथी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, तसेच पुणे, नांदेड, अमरावती विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेण्यात आला आहे; मात्र हा आढावा चरित्रात्मक स्वरूपाचा आहे. सयाजीरावांची भाषणे आणि पत्रव्यवहार विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. त्यादृष्टीने हा पत्रप्रपंच अभ्यासक्रमात समाविष्ट होणे गरजेचे असल्याचे मत महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधन समितीचे सचिव बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.सयाजीराव थोडक्यात समजून घेता येणारमहाराज सयाजीराव गायकवाड यांचा जीवनप्रवास आणि कर्तृत्व २५ खंडांमधून शब्दबद्ध करण्याचे शिवधनुष्य चरित्र साधन समितीने पेलले आहे. सामान्यांना सयाजीराव थोडक्यात समजून घेता यावेत, यासाठी ३२ पानांची छोटी पुस्तिका तयार करण्यात आली आहे.ही पुस्तिका हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय पुढील वर्षभरामध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर अशा चार ठिकाणी दोन दिवसीय परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे.मालेगावपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले कवळाणे हे महाराज सयाजीरावांचे जन्मगाव. ११ मार्च रोजी सयाजीरावांची १५६ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त शासकीय समितीतर्फे पाच पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. यामध्ये युगद्रष्टा, महाराष्ट्राचे शिल्पकार सयाजीराव अशा पुस्तकांचा समावेश आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये २५ खंडांचे प्रकाशन चरित्र साधन समितीतर्फे केले जाणार आहे.सयाजीराव यांच्या नावे शासनामार्फत ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. बडोद्याच्या साहित्य संमेलनात प्रकाशित झालेल्या १२ खंडांचा हिंदीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. यामध्ये भाषण, गौरवगाथा, पत्रव्यवहार, स्वातंत्र्ययोद्ध्यांचे पाठीराखे, प्रज्ञावंत सयाजीराव आदी खंडांचा समावेश आहे. डॉ. सुनीलकुमार लवाटे यांनी हिंदी अनुवादाचे काम पूर्णत्वास नेल्याचे भांड यांनी सांगितले.