शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, नोट ओळखायची कशी?

By admin | Updated: November 16, 2016 02:37 IST

पंतप्रधान मोदी यांनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा दैनंदिन व्यवहारात बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. अचानक जाहीर झालेल्या या निर्णयामुळे

भोसरी : पंतप्रधान मोदी यांनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा दैनंदिन व्यवहारात बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. अचानक जाहीर झालेल्या या निर्णयामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच दोन हजारांची नवी नोट आकाराने व स्पर्शाने ओळखणे अंध बांधवांना सहजशक्य नसल्याने बँकांच्या रांगेत दिवस-दिवस थांबून मिळालेली दोन हजारांची नोट ओळखायची कशी, या गोंधळात अंध नागरिक सापडले आहेत. नवीन नोटांच्या अचानक बदलामुळे पाचशे रुपयांची व दोन हजारांची नवी नोट ओळखण्यास अंध व्यक्तींना अडचणी येत असल्याचे दिसून येते. सर्वसाधारणपणे नवीन नोटांच्या लांबी, रुंदी व जाडी अंध बांधवांना स्पर्शाने ओळखता येते. नवी दोन हजारांची नोट आकाराने १००च्या नोटेपेक्षाही लहान आहे. नवीन नोटांचे नेमके वेगळेपण काय आहे, याची सविस्तर माहिती अंध लोकांना करून देण्यात आली नसल्याने सुरुवातीच्या काळात नवीन आणि बनावट नोटांमधील फरक ओळखणे कठीण जाणार असल्याचे अंध नागरिक सांगतात. नवीन नोटांचा आकार, त्याचा रंग, वैशिष्ट्ये याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सरकारने अंध व्यक्तींना सांगितली नसल्याने अंध नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.नव्या दोन हजारांच्या नोटेचा आकार लहान असल्याने ती २० रुपयांची नोट आहे की दोन हजारांची हे ओळखणे कठीण जात आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही किमतीची नोट तयार करण्यासाठी विशिष्ट कागदाचा वापर केला जातो. कोणत्याही चलनी नोटांवरील आकडे दिसत नसल्याने त्यांच्यामध्ये अत्यंत सुक्ष्म अशी काही वैशिष्ट्ये उपलब्ध करून दिली जातात. संबंधित नोटेच्या कागदाचा दर्जा व स्पर्शज्ञानाने नोट ओळखणे सोपे जाते. मात्र, नव्या दोन हजारांच्या नोटेचा दर्जा इतर जुन्या नोटांपेक्षा कमी आहे. नवी नोट हातात घेतल्यानंतर ती खेळण्यातील आहे की काय असा भास होतो, असे काही अंध नागरिकांनी सांगितले.(वार्ताहर)