शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अशैक्षणिक कार्यक्रमांना विद्यापीठात बंदी, तणावाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 03:27 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांकडून आयोजित केल्या जाणाºया काही अशैक्षणिक कार्यक्रमांमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पुढील काळात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासच परवानगी द्यावी, अशा सूचना विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला देण्यात आल्या असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी सांगितले.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांकडून आयोजित केल्या जाणाºया काही अशैक्षणिक कार्यक्रमांमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पुढील काळात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासच परवानगी द्यावी, अशा सूचना विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला देण्यात आल्या असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी सांगितले. परिणामी या पुढे समाजात घडणाºया चुकीच्या घटनांवर निषेध नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाहेर जावे लागेल.विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया संघटनेच्या (एसएफआय) वतीने ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात निषेध सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केला. तर आमच्या प्रश्नांची उत्तरे एसएफआयकडे नसल्याने आम्ही निषेध सभेनंतर घोषणाबाजी केल्याचा दावा अभाविपतर्फे करण्यात आला. विद्यापीठात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे विद्यापीठात केवळ शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासच मंजुरी द्यावी, असे विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाºयांना सांगण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना समाजातील विविध घडामोडींवर आपले विचार व्यक्त करायचे असल्यास त्यांनी विद्यापीठाबाहेर कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक कार्यक्रम घ्यावेत. अशैक्षणिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी, असेही शाळीग्राम यांनी स्पष्ट केले.रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लागणाररुग्णवाहिका वेळेत न पोहचल्यामुळे विद्यापीठात पीएच.डी. करणाºया विद्यार्थ्याचा जीव गेला. त्यामुळे विद्यापीठाकडे स्वत:ची रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आले. त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत रुग्णवाहिकेसंदर्भातील ठराव मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यामुळे विद्यापीठाने स्वत: रुग्णवाहिका घ्यावी किंवा भाडे करारावर विद्यापीठ परिसरात ठेवावी, यावर निर्णय घेतला जाईल.- डॉ. अरविंद शाळीग्राम,कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Puneपुणे