शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

सावित्री महोत्सव आजपासून

By admin | Updated: February 5, 2015 00:21 IST

अस्सल गावरान उत्पादनांचा पुणेकरांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या सावित्री महोत्सवात स्वाद घेता येणार आहे.

पुणे : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या अस्सल गावरान उत्पादनांचा पुणेकरांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या सावित्री महोत्सवात स्वाद घेता येणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे या महोत्सवाला गुरुवार (दि. ५)पासून सुरुवात होत असून, ९ फेबु्रवारीपर्यंत तो सुरू राहील.जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी उत्पादन केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, बचत गटातील महिला उद्योजकांमध्ये प्रेरणा निर्माण करणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे व उत्पादक ते ग्राहक यांची थेट सांगड घालणे या प्रमुख उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार दर वर्षी जिल्हास्तरावर अशा प्रकारे बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनात सुमारे ८० बचत गट सहभागी होणार असून, विविध उत्पादनांचे ५० स्टॉल लावण्यात येणार आहेत. यांतील २० स्टॉल खाद्यपदार्थांसाठी असतील. (प्रतिनिधी)