शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला बैलाचा प्राण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 17:53 IST

आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे अनिल रमेश वाळुंज खिलार जातीच्या बैलावर बिबट्याने सोमवारी मध्यरात्री हल्ला केला.

ठळक मुद्देबिबटयाला पकडण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी वनविभागातर्फे पिंजरा वनविभागातर्फे नागरिकांनी रात्री बाहेर पडताना बॅटरी व काठी घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे अनिल रमेश वाळुंज खिलार जातीच्या बैलावर बिबट्याने सोमवारी मध्यरात्री हल्ला केला. मात्र, बैलाने जीवाच्या आकांताने हंबरडा फोडल्याने खिलारे कुटुंब जागे झाले. त्यावेळी कुटुंबियांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. तर तालुक्यातील दुसऱ्या घटनेत वळसे मळयातील शेतकरी संदिप निवृत्ती हिंगे यांच्या गोठ्यातील शेळीवर मंगळवारी (दि.२४ ) रोजी पहाटेच्या सुमारास हल्ला करून बिबट्याने तिला ठार केले.   निरगुडसर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी बिबटया प्रत्यक्ष पाहिला देखील आहे. काही ठिकाणी मागणीनुसार वन विभागाने वेगवेगळया ठिकाणी पिंजरा लावलेला आहे. सोमवारी पहाटे अनिल रमेश वाळुंज यांच्या गोठ्यातील बैलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यातून वाचण्यासाठी बैल मोठ्याने हंबरडा फोडू लागला. यामुळे खिलारे कुटुंब जागे होऊन बाहेर आले. तेव्हा त्यांना बिबटयाने तोंडात बैलाची मान धरल्याचे निर्दशनास आले. त्यावेळी त्यांनी आरडा-ओरडा करून बैलाला बिबट्याच्या तावडीतुन सोडविले. या घटनेत बैल गंभीर जखमी झाला आहे. बिबटयाला पकडण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात येईल. मात्र नागरिकांनी रात्री अपरात्री बाहेर पडताना बॅटरी व काठी घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.---------------------------------------------

टॅग्स :Mancharमंचरleopardबिबट्या