शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सवंगड्यांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:50 IST

माळीण दुर्घटनेतून नशिबाने वाचलेल्या तसेच माळीण गावाच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यावस्त्यांवर राहणाºया मुलांनी आपल्या सवंगड्यांच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना ताज्या केल्या

नीलेश काण्णवघोडेगाव : माळीण दुर्घटनेतून नशिबाने वाचलेल्या तसेच माळीण गावाच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यावस्त्यांवर राहणाºया मुलांनी आपल्या सवंगड्यांच्या आठवणी ‘लोकमत’शी बोलताना ताज्या केल्या. त्या सांगताना आजही त्यांना गहिवरून येत आहे.दुघर्टनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने या मुलांशी जुन्या गावातील बंद शाळेजवळ ‘लोकमत’ने संवाद साधला. या वेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. जुने मित्र, गावातील मारुतीचं मंदिर, मंदिराजवळील पटांगण, लपाछपी खेळताना पायाखाली घातलेले गाव, गावातील बैलपोळा आठवतो.आता शाळा नवीन इमारतीत भरते; परंतु, रोज या शाळेत जाण्यासाठी जुन्या गावातून जावे लागते. रस्त्याने जाताना मुलांना मातीचा ढिगारा दिसतो. मात्र त्यांच्या आवडीचे मारुती मंदिर, पटांगण, शाळेतील मित्र, गुरुजी, शाळेचे भरलेले वर्ग दिसत नाहीत.राजश्री विजय लेंभे हिला मीराबरोबर शाळेच्या पटांगणात एकत्र खेळतानाचे दिवस आठवले. लंगडी, कबड्डी खेळतानाचे दिवस, तिच्या घरी जाऊन खाल्लेला डबा आठवतो.चंद्रभागा कुमार लेंभे हिला मैत्रीण सुप्रिया पोटे आठवते. ‘ती माझी बेस्ट फे्रंड होती.पण आता आमचे मित्र आम्हाला भेटणार नाहीत, म्हणून खूप वाईट वाटते,’ असे ती सांगते.प्रवीण दिलीप लेंभे याला आपला जिवलग मित्र सागर व त्याच्याबरोबर बैलपोळ्यात केलेली मजा आठवते. ‘पोळ्याच्या दिवशी सागर आणि मी बैलांना ओढ्यावर नेऊन धुवायचो, सजवायचो, गावातून निघणाºया बैलांच्या मिरवणुकीत नाचायचो आणि संध्याकाळी पोटभोर पोळ्या खायचो. पोळा आला की मला सागर आठवतो’, अशी आठवण प्रवीणने सांगितली.त्याचबरोबर प्रज्वल दिनेश लेंभे, दीपाली विजय लेंभे, जयश्री बुधाजी लेंभे, सचिन संदीप लेंभे, संकेश बुधाजी लेंभे या मुलांनी गावातील यात्रा व बैलपोळ्याविषयीच्या आठवणी सांगितल्या.