शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पालिका आयुक्तपदी सौरभ राव, जिल्हाधिकारीपदी नवलकिशोर राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 03:20 IST

महापालिकेच्या आयुक्तपदी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती झाली. गेल्या चार वर्षांपासून राव पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

पुणे : महापालिकेच्या आयुक्तपदी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती झाली. गेल्या चार वर्षांपासून राव पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांची ‘मेडा’च्या महासंचालकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आसाम केडरचे आयएएसअधिकारी विशाल सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राव हे २००३च्या बॅचचे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी या पूर्वी नागपूर, नंदुरबार जिल्हाधिकारी, सोलापूर महापालिका आयुक्त आणि गोंदिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यावर पुण्याची जबाबदारी होती.- एप्रिल २०१७ मध्ये डॉ. बिपीन शर्मा यांची शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती, वर्षभरातच त्यांची बदली करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तपदावर नियुक्ती झालेल्या एकाही अधिकाऱ्याला त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही, त्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. बिपीन शर्मा यांची ‘मेडा’च्या संचालकपदी बदली झाली आहे. अपंग कल्याण आयुक्त एन. के. पाटील यांचीही बदली झाली आहे. सध्या त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. सोळंकी हे पुरंदर तालुक्यातील असून, आसाम केडरमधून प्रतिनियुक्तीवर आले आहेत.आयुक्त, जिल्हाधिकारी आज स्वीकारणार पदभारपुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत.गेल्या चार वर्षांत केलेल्या कामाबाबत समाधानी असून, त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्या. पुणेमहानगरपालिका व पीएमआरडीएबरोबर विविध विकासकामे करण्याची जाणीव झाली. पालिकेत विविध कामे प्राधान्याने करावी लागतात. पुणे व हैदराबाद ही दोन शहरे निवासासाठी योग्य असल्याचा अहवाल समोर आला आहे. परंतु, पुणे शहर राहण्यासाठी अधिक चांगले कसे होईल, यादृष्टीने नियोजन केले जाईल. पालिकेसमोर वाहतुकीचा प्रश्न असून, सार्वजनिक वाहतूक वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच पालिकेत समाविष्ट झालेल्या नवीन गावांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक कामे केली जातील.- सौरभ राव, मावळते जिल्हाधिकारी

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका