शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

देशपातळीवर सासवड पालिका चमकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:26 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचा निकाल नुकताच दिल्ली येथे जाहीर करण्यात आला.

सासवड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचा निकाल नुकताच दिल्ली येथे जाहीर करण्यात आला. यामध्ये सासवड नगरपालिकेचा देशपातळीवरील पश्चिम विभागात प्रथम क्रमांक आला आहे. नगरपालिकेला १५ कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम राज्य शासनाकडून मिळणार आहे. तर, पंतप्रधानांच्या हस्तेही सन्मान होणार आहे.नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी विनोद जळक व नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी याबाबत माहिती दिली. देशातील ४ हजार २०३ नगरपालिकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातून सासवड नगरपालिकेला देशाच्या एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पश्चिम विभागात नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली प्रकारात प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. हे वृत्त समजताच सासवड शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाक्यांच्या जल्लोषात आनंद व्यक्त केला.या वेळी सत्ताधारी जनमत विकास आघाडीचे प्रमुख व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. कै. चंदुकाका जगताप यांच्या स्मृतींनाहे बक्षीस अभिवादन आहे.पुढील वर्षातही पालिका स्पर्धेत उतरून पुन्हा काम दाखवेल, असे ते म्हणाले. सासवड नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेतले होते. त्यानुसार विविध प्रकारची कामे चालू केली. यातील महत्त्वाचा कचरावेचकांचा प्रश्न यासाठी नगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये कचरावेचकांचा समावेश करून घेऊन कचऱ्याचे १०० टक्के घरोघरी जाऊन संकलन केले गेले.बगिचामध्ये व कचरा डेपोमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती करून घनकचरा व्यवस्थापनांतर्गत तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताला महाराष्ट्र शासनाचा हरित महा सिटी कंपोस्ट हा ब्रँड विपणन व विक्री करण्यासाठीचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ डिसेंबर २०१७ ला नगर परिषदेला मुंबई येथे प्रदान करण्यात आले.>सॅनिटरी नॅपकीनचे शास्त्रोक्त संकलनघनकचºयातील सॅनिटरी नॅपकीनच्या शास्त्रोक्त संकलनासाठी नगरपालिकेच्या प्रत्येक कचरा संकलन वाहनावर हायजिन बॉक्सची व्यवस्था केली. पालिकेचे मुख्यधिकारी विनोद जळक यांनी राबविलेल्या हायजिन बॉक्स या संकल्पनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. सासवड शहरात प्रतिमहा ४० ते ५० हजार सॅनिटरी नॅपकीन कचºयात जमा होत होते. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून मुख्याधिकारी विनोद जळक यांनी हायजिन बॉक्स ही संकल्पना अमलात आणली. सिद्धेश साकोरे या विज्ञान आश्रम, पाबळ यांच्याकडील विद्यार्र्थ्यांच्या मदतीने सासवड नगरपालिकेने हायजिन बॉक्सचा शोध घेतला, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली. या प्रसंगी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, माया जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, संजय ग. जगताप, प्रवीण भोंडे, दीपक टकले, सचिन भोंगळे, चंदू गिरमे, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, नगरसेविका वसुधा आनंदे, निर्मला जगताप, पुष्पा जगताप, विद्या टिळेकर, सारिका हिवरकर, सीमा भोंगळे, मंगल म्हेत्रे, भाग्यश्री जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, रामानंद कळसकर आदी उपस्थित होते.