पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला आतापर्यंत सातत्याने विरोध केला आहे. शासन अजूनही निश्चित जागा जाहीर न करता शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे येथील नागरिक वैतागले आहेत.
आरक्षणामुळे नागरिकांची शेती, घरे, विविध प्रकारच्या फळबागा, विहिरी, शेततळी, पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच शेतीच्या जागेत आर झोन तर गावठाण लगत ग्रीन झोन टाकलेला आहे. ग्रामीण भागात तब्बल १०० फूटपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते टाकलेले आहेत. यामुळे शेतकरी पूर्णपणे बेघर होण्याची भीती आहे. एकीकडे विमानतळ प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक भयभीत असताना नवीन आरक्षणामुळे मोठी भीती निर्माण झाली आहे. तर रिंग रोड चे अक्षरशः जाळेच झालेले आहे. त्यामुळे भविष्यात शेतीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे या विकासकामांना शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे.
शेतकऱ्यांच्या हरकती स्वीकारण्यासाठी पुणे येथील मुख्य कार्यालयात व्यवस्था केली होती. परंतु सर्वच नागरिकांना पुणे येथे जाता येत नसल्याने तालुका पातळीवर स्वीकारण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या दोन, तीन दिवसांपासून पुरंदर तहसील कार्यालयात हरकती स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. तालुक्यातील भिवरी, गराडे पासून कोडीत, चांबळी, बोपगाव, हिवरे, दिवे, सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, गुरोळीसह इतर गावांतील नागरिक मोठ्या संख्येने हरकती दाखल करीत आहेत, शासनाने सर्वच प्रकल्प आमच्या जागेत उभारले तर आम्ही जायचे कुठे ? आमच्या शेती, घरादारावर नांगर फिरवून प्रकल्प उभारू नयेत असा इशारा वनपुरी गावचे सरपंच नामदेव कुंभारकर यांनी दिला आहे.
050921\1854-img-20210905-wa0014.jpg
?????: ???????? ???? ???????? ?? ???????? ?????? ???????.????? ?????????????? ?????????? ???????? ?????????? ????? ???? ???.