शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

सासवड नगरपालिका हद्दीत संपूर्ण दारूबंदी

By admin | Updated: May 12, 2017 04:58 IST

संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय आज (दि. ११) झालेल्या सासवड नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय आज (दि. ११) झालेल्या सासवड नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या सभेत नगरपालिकेच्या हद्दीत असलेले राज्य व केंद्रीय शासनाचे मार्ग नगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचा ठराव झाला होता. सासवड शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या मूलभूत सोयी देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे नगरपालिकेने सांगितले, तरी दारूधंद्यासाठी हा निर्णय घेतल्याची जोरदार टीकाही झाली. या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेने नगरपालिका हद्दीत दारूबंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. इथून पुढे दारू दुकाने, मावा आदींसाठी नगरपालिका ‘ना हरकत’ दाखला देणार नाही, परवानगी देणार नाही, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.याविषयी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप म्हणाले, ‘‘नगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या पालखी महामार्गावर दार दोनशे फुटांवर पाणी, ड्रेनेज व वीज यांसाठी तीन पाईप टाकावेत, अशा सूचना यापूर्वी वारंवार शासनाच्या बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. त्या मंजूर होत नसल्याने नगरपालिकेने महामार्ग ताब्यात घेण्याचा ठराव केला. मात्र, दारूधंद्यांसाठी रस्ते ताब्यात घेणार, असा त्याचा अर्थ काढला. त्यामुळे जनमताचा आग्रह लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.’’ दारूबंदी ठराव करणारी भारतातील ही पहिली नगरपालिका आहे. याचे अनुकरण इतर नगरपालिकांनी करावे, असेही जगताप म्हणाले. सासवड पोलीस ठाण्याच्या विनंतीनुसार शहरातील विविध चौकांत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषद व लोकसहभागातून ही सोय उपलब्ध करणार आहे. सासवडच्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात येईल.या प्रसंगी मुख्याधिकारी विनोद जळक, उपाध्यक्ष विजय वढणे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, मनोहर जगताप, संदीप जगताप, संजय ग. जगताप, प्रवीण भोंडे, दीपक टकले, सचिन भोंगळे, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, नगरसेविका पुष्पा जगताप, निर्मला जगताप, वसुधा आनंदे, सारिका हिवरकर, सीमा भोंगळे, विद्या टिळेकर, माया जगताप, मंगल म्हेत्रे, डॉ. अस्मिता रणपिसे उपस्थित होत्या.