शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
3
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
4
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
6
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
7
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
8
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
9
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
10
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
11
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
12
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
13
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
14
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
15
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
16
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
17
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
18
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
19
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
20
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाचे उद्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2015 01:05 IST

उडणारी भिंत... रेड्याच्या तोंडातून वेदपठण... ज्ञानेश्वरांची निरागस प्रतिमा... या गोष्टी डोळ्यांसमोर आल्या, की चटकन ‘संत ज्ञानेश्वर’ हा बोलपट आठवतो.

पुणे : उडणारी भिंत... रेड्याच्या तोंडातून वेदपठण... ज्ञानेश्वरांची निरागस प्रतिमा... या गोष्टी डोळ्यांसमोर आल्या, की चटकन ‘संत ज्ञानेश्वर’ हा बोलपट आठवतो. प्रभात फिल्म कंपनीच्या या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या मांदियाळीत एक नवा मानदंडच प्रस्थापित केला नाही तर सातासमुद्रापारही ‘ज्ञानदेव लाईट आॅफ एशिया’ अशा समर्पक नावाने अमेरिकेत हा चित्रपट प्रदर्शित झाला, हे त्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य! मराठी चित्रपट इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला हा चित्रपट उद्या (सोमवारी) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. दामले-फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १८ मे १९४0 मध्ये मुंबई आणि पुण्यात एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता, त्याला आता ७५ वर्षांचा काळ लोटत आहे. या चित्रपटनिर्मितीमागच्या अनेक आठवणींना अनिल दामले यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘पुण्यात प्रदर्शनाच्या दिवशी संत ज्ञानेश्वर चित्रपटाची प्रिंट वाजत-गाजत, टाळ मृदंगांच्या गजरात व ग्यानबा तुकारामच्या घोषात चित्रपटगृहावर आणण्यात आली होती. प्रेक्षक ‘ग्यानबा-तुकाराम’च्या घोषात रंगून गेले होते. तब्बल ३६ आठवडे हा चित्रपट मुंबई-पुण्यात चालला. प्रभातचे १९३२ मध्ये पुण्यातल्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाले होते. दामले-फत्तेलाल यांनी १९३६मध्ये दिग्दर्शित केलेला संत तुकाराम चित्रपट देशभरात गाजला. त्यानंतर त्यांनी ‘गोपाळ कृष्ण’ दिग्दर्शित केला. याही चित्रपटाला घवघवीत यश मिळालं. कंपनीला नाव आणि पैसाही मिळाला. तेव्हाच दामल्यांनी, पुढचे चित्रपट संतपट काढायचे असे मनात ठरवले होते. संत दामाजीची कथा त्यांच्या मनात होती. परंतु तेव्हाचा काळ हा दुसऱ्या महायुद्धात होरपळून निघत होता. मानवता लोप पावत चालली होती? अशा वेळी मानवता आणि शांततेचा संदेश देणारा चित्रपट काढणं दामल्यांना जास्त कालानुरूप वाटलं. त्यातूनच ‘संत झानेश्वर’ची कथा आकार घेऊ लागली.’’(प्रतिनिधी)चेहऱ्यावरील सात्विक तेजोभावासाठी मोडक यांचा उपवास४संत ज्ञानेश्वर ज्या वेळी समाधी घ्यायला निघतात, त्या वेळी चेहऱ्यावर सात्विक तेजोभाव दिसण्यासाठी शाहू मोडकांनी तीन दिवस उपवास केला होता. संत ज्ञानेश्वर चित्रपटानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले असल्याचे सांगितले जाते.छोटा ज्ञानेश्वर अचानक गवसला४छोट्या ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी स्टुडिओत एक बालकलाकार काम शोधायला आला होता. ‘यशवंत निकम’ हे त्याचे नाव. त्याचे बोलके, भावूक डोळे आणि सात्विक दिसणं पाहून छोटा ज्ञानेश्वर गवसल्याची जाणीव सर्वांना झाली. यशवंत निकमच्या सख्ख्या भावंडांनी चित्रपटातील ज्ञानेश्वराच्या भावंडांची भूमिका लीलया पार पाडली.