पुणे: कोरोना निर्मूलनासाठी सरकार करत असलेल्या उपायांमध्ये आपलाही खारीचा वाटा यासाठी आम आदमी रिक्षा संघटनेने रिक्षा सॅनिटाइज करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
दोन दिवसांत पुणे स्थानक, धायरी व शहरातील अन्य काही ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते आनंद अंकुश, असिफ मोमिन, असगर बेग, सुनील फतपुरे, किरण कांबळे, अशोक शिंदे, मनोज फुलावरे, चाँद शेख, अनिल धुमाळ यांनी २ हजार रिक्षा सॅनिटाईज केल्या.
संघटना स्वखर्चाने हा उपक्रम करत आहे. सरकारने अंशतः टाळेबंदीतून रिक्षा वगळल्याचे स्वागत आहे. रिक्षा व्यावसायिकांकडून कोरोनावाढीला चुकूनही हातभार लागू नये या हेतूने संघटना हे करत असल्याचे संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांंनी सांगितले.
चौकट
प्रवाशांना लुटू नका
पीएमपीची बससेवा बंद आहे म्हणून रिक्षाचालकांनी जादा भाडे आकारण्याचे बेकायदेशीर प्रकार करू नये, असे आवाहन आम आदमी रिक्षा संघटनेने केले आहे.