शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सांगवी-डोर्लेवाडी गटात चुरस वाढणार

By admin | Updated: January 23, 2017 02:35 IST

डोर्लेवाडी-सांगवी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटामध्ये अनेक मोठी समीकरणे

काटेवाडी : डोर्लेवाडी-सांगवी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटामध्ये अनेक मोठी समीकरणे तयार होत आहेत. पूर्वी हा गट गुणवडी-निरावागज हा गट अस्तित्वात होता. येथून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विश्वास देवकाते हे राष्ट्रवादीकडून निवडून आले. हा गट-गण आजी-माजी सभापतींचा आहे. पुनर्रचनेमध्ये या गटामध्ये सांगवी, शिरवली, कांबळेश्वर या गावांचा नव्याने समावेश झाला असल्यामुळे या गटामध्ये चुरस निर्माण होणार आहे. हा गट महिला सर्वसाधारण झाला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला गट महायुतीच्या नेत्यांनीदेखील निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. भाजपा महायुतीचे सरकार या राज्यामध्ये असल्यामुळे भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विरोधी गटामध्ये भाजपाचे चंद्रराव तावरे, माळेगावचे संचालक विलासराव देवकाते, माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे, बापूराव सोनवलकर, प्रदेश युवा मोर्चा चिटणीस अभिजित देवकाते, संजय गांधी निराधार योजनेचे राहुल तावरे, माळेगावचे संचालक अविनाश देवकाते, माळेगावचे उपाध्यक्ष रामदास अटोळे, भाजपाचे सरचिटणीस भारत देवकाते, रासपचे जिल्हा अध्यक्ष संदीप चोपडे, बाळासाहेब कोळेकर, महेंद्र तावरे अशी मोठी फळी आहे. तर राष्ट्रवादीकडे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव देवकाते, मदनराव देवकाते, निरावागजचे माजी सरपंच संजय देवकाते, पंचायत समितीचे सभापती करण खलाटे, किरण तावरे, अशोक नवले, पोपटराव झारगड, कुंदन देवकाते, गुलाबराव देवकाते, ‘छत्रपती’चे आजी-माजी संचालकांची फळी राष्ट्रवादीकडे आहे. जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादीकडून निरावागजचे माजी सरपंच संजय देवकाते यांच्या पत्नी वंदना देवकाते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी अध्यक्ष किरण तावरे यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे, वैशाली तावरे, शिरवलीच्या अश्विनी धुमाळ, डोर्लेवाडीच्या सरपंच राधा जाधव, कल्याणी वाघमोडे इच्छुक आहेत. भाजपाच्या वतीने प्रदेश भाजपाचे सरचिटणीस अभिजित देवकाते, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष युवराज तावरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राहुल तावरे, नीरावागजचे राजाभाऊ देवकाते यांच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा आहे. या गणामधील निवडणूकराष्ट्रवादीला सोपी राहिली नाही. या गटामध्ये माळेगाव कारखान्याचे मोठे कार्यक्षेत्र आहे. हा कारखाना अजित पवार यांच्या विरोधात असल्यामुळे येथे राष्ट्रवादीची दमछाक होणार आहे. तसेच सभापतिपदाचा उमेदवार या गणातून निवडून येणार असल्यामुळे या गट व गणात राष्ट्रवादी विरोधात प्रचाराला सरकारमधील मंत्री प्रचारला येणार आहेत. त्यामुळे या विरोधकांकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, रासप, जनक्रांती आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच डोर्लेवाडी गणामध्ये ढेकळवाडी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी, मेखळी, घडगेवाडी या गावांचा समावेश आहे. येथेही चुरस निर्माण होणार आहे.या गणातून भाजपाकडून ढेकळवाडीचे बापूराव सोलनकर, मेखळीतून रासपचे संदीप चोपडे, सोनगावचे प्रकाश देवकाते, शिवसेनेचे निखिल देवकाते, शेतकरी संघटनेचे महेंद्र तावरे तर राष्ट्रवादीकडून विठ्ठल देवकाते, रमेश मोरे, अशोक नवले, शामराव चोपडे, अविनाश भिसे, राहुल झारगड, बापू गवळी, अविनाश काळकुटे, विकास माने इच्छुक आहेत. (वार्ताहर)