शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबाराची खोटी अफवा पसरविणाऱ्याला सांगवी पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 15:08 IST

पिंपळे गुरवमध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देपिंपळे गुरवमध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.प्रसाद उर्फ लल्या दीपक पाटील (वय २१, राहणार काशिद पार्क, पिंपळे गुरव) असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड, दि. 21- पिंपळे गुरवमध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या दीपक पाटील (वय २१, राहणार काशिद पार्क, पिंपळे गुरव) असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

मंगळवार (ता. १९) रोजी रात्री साडेबारा वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला पिंपळे गुरव येथील शहीद भगतसिंग चौकात गोळीबार झाल्याची माहिती एका महिलेने दिली. त्यांनी तातडीने ती माहिती सांगवी पोलिसांना दिली. त्याप्रमाणे रात्रपाळीत काम करणारे पोलीस उपनिरिक्षक अमित शेटे व मार्शल तात्काळ घटना स्थळी हजर झाले होते. पण तेथे असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. बाजूला असणाऱ्या सुरक्षा रक्षकांचीही शेटे यांनी चौकशी केली. पोलीस नियंत्रण कक्षास फोन करणाऱ्या व्यक्तीनेही त्याचा फोन बंद केल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर हिंजवडी व पुणेशहराच्या रात्रपाळीतील पोलीस अधिकाऱ्यांनी  घटना स्थळास भेट दिली व अधिक पोलीस कर्मचारी वर्गास तेथे पाचारण केलं. अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त बावीस्कर, गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम पाटील, वरीष्ठ पोलिस निरिक्षक व सांगवी पोलिस ठाण्याचे प्रमुख अजय चांदखेडे, अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरिक्षक बलभीम ननवरे, अमित शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फोन करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती

त्यानुसार पोलिसांना आलेल्या फोन धारकाचा शोध घेतला असता तो हनुमान सुधाकर कलगाने (वय १८, राहणार पिंपळे गुरव) याचा निघाला. त्याने फोन सोमवार (ता. १८) रोजी रात्री दहा वाजता चोरीस गेल्याचं सांगितलं. त्यामुळे गुंता अधिकच वाढत गेला. पण पोलिसांनी पुढे कसून तपास करत आरोपी प्रसाद उर्फ लल्या याला अटक केली. आरोपीने कलगाने यांचा फोन चोरी केल्याची तसंच महिलेच्या आवाजात फोन करून गोळीबार झाल्याची तक्रार केली असल्याची कबुली दिली. पण असा कुठलाही गोळीबार तेथे झाला नसल्याचं पोलीस तपासातून उघड झालं.