नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता पाटील, अभिनेत्री स्मिता प्रभू, शेफाली भुजबळ, वत्सला खैरे, अर्चना देवरे, नवनाथ ढगे, बापू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .
नारायणगाव येथील धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेच्या संचालिका असलेल्या संध्या गायकवाड ह्या गेली २० वर्षांपासून द्राक्ष व डाळिंबाची शेती बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. गायकवाड यांना याअगोदरही विविध संस्थांच्या वतीने आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
नारायणगाव येथील प्रगतशील शेतकरी संध्या बापू गायकवाड यांना “राष्ट्रीय अहिल्या रत्न पुरस्कार”ने भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.