शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांना भिगवण पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : उजनी धरणातून वाळूउपसा करणाऱ्या वाळू तस्करांना महसूलच्या पथकाने तसेच भिगवण पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिगवण : उजनी धरणातून वाळूउपसा करणाऱ्या वाळू तस्करांना महसूलच्या पथकाने तसेच भिगवण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी (दि. १३) खानवटे आणि डिकसळ परिसरात वाळूउपसा करणाऱ्या बोटी, तर चार सक्शन बोटी अशा एक कोटीच्या बोटी जिलेटिनच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या. या प्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

सिपू नुरुलहक्क शेख (वय ३०), मोहम्मद नाईम जलालुद्दीन अख्तर (वय २३), जहीर शहाजहान शेख (वय ३०), साहिब पेशकर शेख (वय ३२, सर्व रा. बिकोल टोला, ता. पलशगच्ची, जि. साहेबगंज झारखंड), मोहम्मद अहमद हुसेन शेख (वय ३०), मुश्राफ कादर शेख (वय २९), इस्माईल इनसाराली शेख (वय ३६), अनसुर इनामुल शेख (वय २८) तसेच त्यांचे इतर १० साथीदार आणि ३ बोटीमालक वाळूमाफिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. फरार तीन आरोपींचा शोध सुरु आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन माने यांच्या पथकातील पोलीस हवालदार दतात्रय खुटाळे, इन्क्लाब पठान, समीर करे, दतात्रय जाधव यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळू माफियांवर भिगवण पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत १ कोटी रुपयांची चोरी करण्यास आवश्यक असणारी यंत्रणा नष्ट करण्यात आली. उजनी धरणातील वाळू तस्करांवर अनेक वेळा कारवाई करूनही मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. येथील वाळूउपशाबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. खानवटे आणि डिकसळ परिसरात रात्री अंधाराचा फायदा घेत चार बोटी आणि चार सक्शन बोटींनी वाळूचा उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जीवन माने यांनी पोलीस पथकासह उजनी धरणातील वाळूचोरी करणाऱ्या फायबर आणि सेक्शन यांच्यावर कारवाई केली. डिकसळ येथील पुलावर रात्री अडीच वाजता पोलीस गेले. या ठिकाणी त्यांना वरील चार बोटी वाळूउपसा करताना दिसल्या. पोलिसांनी बोटीच्या साह्याने धरणात जात या वाळूउपसा करणाऱ्या बोटी ताब्यात घेत १७ जणांना अटक केली. या वेळी तीन बोटमालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. खानवटे येथेही कारवाई करत तेथील बोटी डिकसळ येथे आणल्या. यानंतर सकाळी याची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. सकाळी महसूल विभागाचे पथक डिकसळ येथे आले. या वेळी त्यांनी बोटींची पाहणी केली. जिलेटीनच्या साह्याने पोलिसांच्या उपस्थितीत या सर्व बोटी नष्ट करण्यात आल्या.

कोट

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उजनी जलाशयात वाळूचोरी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. यापुढेही वाळू तस्करांविरोधात कारावाईत सातत्य राखून कठोर कारवाई केली जाणार आहे. काल केलेल्या कारवाईत १ कोटींच्या बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत.

- जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस ठाणे

चौकट

आतापर्यंत वाळूमाफियांवर केलेल्या कारवाईत तस्करांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. असे असले तरी वाळूमाफियांवर गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण अल्प होते. बोटी नष्ट केल्या तरी झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पुन्हा दुरुस्ती करत वाळूमाफिया पुन्हा सक्रिय होत आहे. मात्र, आता गुन्हे दाखल होत असल्याने खऱ्या अर्थाने वाळूमाफियांचे कंबरडे मोडणार आहे.