सरंपच विद्याधर काटे यांनी नुकतीच उपसरपंचपदासाठी बैठक आयोजित केली होती. यामध्ये मुलाणी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी मुलाणी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर उपसरपंच मुलाणी म्हणाले की, बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी आधिक जोमाने कार्यरत राहणार आहे. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत आंनदोस्तव साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व संरपच विद्याधर काटे यांच्या हस्ते मुलाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पवार, संभाजी ब्रिगेडचे अमोल काटे, पोलीस पाटील सचिन मोरे, अमर जगताप, किरण वायसे, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर घुले, नितीन भिसे, धीरज घुले, राहुल काटे, राजू भिसे, दीपक वाघमोडे, हसन तांबोळी, दादा भिसे, सदस्या शीतल काटे, हेमलता जगताप, रंजना लोंखडे, प्रियंका देवकाते आदी उपस्थित होते.