शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातही बुली बाईसारखा प्रकार? शहरातील मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 10:00 IST

पुणे : वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी ...

पुणे : वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. न्यायालयाने त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक केली. याबाबत त्याच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ९ जानेवारी रोजी खडकी (khadki, pune) परिसरात ही घटना घडली.

आरोपीने तो राहत असलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर त्या फोटो आणि व्हिडिओचे अश्लील स्वरूपात रूपांतर करून ते व्हायरल केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तरुणाला न्यायालयात हजर केले असता, हा २०१९ पासून तो अशाप्रकारे प्रकारे फोटो आणि व्हिडिओ तयार करत आहे.

आरोपीने जप्त मोबाईल हँडसेटसह इतर मोबाईलचादेखील वापर केला आहे. त्या इतर हँडसेटबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे, तसेच त्याने वस्तीमधील महिला आणि मुलींचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले आहेत. त्यातील १८ वर्षांखालील ४ मुली आणि ३ महिलांची नावे निपन्न झाली आहेत. उर्वरित मुली, महिलांबाबत तपास करायचा आहे.

आरोपीच्या व्हाॅट्सअपच्या यादीमध्ये ब्राझील, पाकिस्तान यासह अन्य देशातील ग्रुप असून त्यावर अनेक अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्याबाबत त्याच्याकडे तपास करण्यासाठी, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली.