शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरीच्या पायथ्याशी मानापमान नाट्य, शिवभक्तांना रोखल्यामुळे संभाजीराजे नाराज; CM शिंदेंनी काढली समजूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 11:56 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पण शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात मानापमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं.

पुणे-

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पण शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात मानापमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं. शिवभक्तांना शिवनेरी गडावर दर्शन घेण्यास रोखण्यात आल्याची तक्रार करत माजी खासदार संभाजी छत्रपती संतापलेले पाहायला मिळाले. शिवभक्तांची नाराजी त्यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी बोलून दाखवली आणि कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर जाण्यासही नकार दिला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजी छत्रपतींची समजून काढण्याचा प्रयत्न केला. पण शिवनेरीवर दुजाभाव कशासाठी? असा सवाल उपस्थित करत संभाजी छत्रपतींनी व्यासपीठावर न जाणं पसंत केलं. 

शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी काही व्हिआयपींना पासेस देऊन सोडण्यात येत आहे आणि शिवभक्तांना मात्र रोखून धरण्यात आलं आहे, अशी तक्रार शिवभक्तांनी छत्रपती संभाजी यांच्याकडे केली. हा प्रकार पाहून संभाजी छत्रपती प्रचंड संतापले आणि थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याचा जाब विचारला. शिवनेरीवर दुजाभाव होता कामा नये. जोपर्यंत शिवनेरीवर शिवप्रेमींना सोडलं जात नाही. तोपर्यंत मीही शिवनेरीवर जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा संभाजीराजे यांनी घेतला. यामुळे शिवनेरीवर काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

पुरातत्व विभागाने सांगितलं की महाराजांचा जन्म झाला तिथं जाता येणार नाही. तसं असेल तर मग इतर कुणालाही तिथं जाऊ देऊ नका. फक्त शिवप्रेमींनाच बंदी का? हा असा कुठला नियम आहे? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासनशिवनेरीवर आयोजित शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या नाराजीची दखल घेत आपल्या भाषणातून त्यांना व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं. तसंच पुढच्यावेळेपासून व्यवस्थित नियोजन केलं जाईल अशी ग्वाही संभाजीराजेंना दिली. "मी तुमच्या भावनांची नोंद घेतली आहे. तुमच्या भावना ऐकल्या आहेत. हे सरकार तुमचंच आहे. आपण शिवरायांचे मावळे आहोत. किल्ले जपण्याचं आपण एकत्रित येऊन काम करू. पुढच्यावर्षीचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल असं आश्वासन मी देतो", असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजीराजे छत्रपतींची समजूत काढण्याचा प्रयत्न यावेळी केला.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivjayantiशिवजयंती