पुणे : रोजचे धकाधकीचे जीवन, नोकरीमधील ताणतणाव, घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यातच आजच्या काळातील नोकरी करणारी करणारी महिला असो वा गृहिणी संपूर्णत: गुरफटून गेलेली असते. स्वत:वर असलेल्या जबाबदाऱ्या पार पार पाडता ही स्त्री महाविद्यालयीन आयुष्यात अंगात असणारा जोश, नवीन एखादी कला शिकून स्वत:तील कलागुण इतरांसमोर साकारण्याची ईर्षा कुठेतरी हरवून बसते आणि मग सुरू होतो स्वत:च्याच आयुष्याशी झगडा. अशाच स्वत:तील इच्छा, आकांक्षा प्रत्यक्षात आणू इच्छिणाऱ्या महिलांसाठी लोकमत सखी मंचने व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे योजले आहे.लोकमत सखी मंच व बिग बाजारच्या सहयोगाने आपल्या प्रतिभेला सशक्त मंच देणारा, कलागुणांची चौफेर उधळण करणारा एक सोहळा ‘सखी महोत्सव’चे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वत:ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आज व उद्या सकाळी ११.३० वाजता हा महोत्सव घेतला जाईल. स्पर्धेसाठी नावनोंदणी घेण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेला अभिनेता सचिन खेडेकर, मिलिंद सोमण, विविध नवीन विषय हाताळलेल्या चित्रपटांत भूमिका केलेली देविका दफ्तरदार, दिग्दर्शक जयप्रसाद देसाई, राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार संभाजी भगत आणि महेश केळुसकर अशा ‘नागरिक’ या येणाऱ्या चित्रपटात अभिनय केलेल्या दिग्गज कलाकारांना भेटण्याची संधी लोकमत सखी मंचच्या सभासदांना उद्या सायंकाळी ४ वाजता मिळणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे.
सखी महोत्सवास आजपासून प्रारंभ
By admin | Updated: May 21, 2015 01:50 IST